साकळी कक्षात शेती विजपंप बिल भरण्यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद- सहाय्यक अभियंता निलेश पाटील
मनवेल ता यावल दि.२१(प्रतिनिधी गोकुळ कोळी) : शासनाच्या कृषी वीजसंजीवनी योजने- २०२० अंतर्गत शेती विज पंपाचा बिल भरणा महावितरणच्या साकळी कक्ष अंतर्गत उपमुख्य कार्यकारी अभियंता दिलीप मराठे तसेच साकळी विज वितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता निलेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली साकळी गावासह परिसरातील शेतकऱ्यांकडून शेती वीज पंपाचा विजबिल भरणा करण्यास दि १४ रोजी पासून सुरुवात झालेली असून आतापर्यंत जवळपास पाच ते सहा लाख रुपयांची वसुली झालेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेती विजबिल भरण्या करिता परिसरातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कामी शेतकऱ्यांना सहाय्यक अभियंता निलेश महाजन यांच्यासह सर्व विज कर्मचारी तसेच ग्रामपंचायत सदस्य दिनकर माळी यांचे सहकार्य मिळत आहे.
सदर योजना ही शेतकरी हिताची असून शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात फायदा घ्यावा व आपल्या शेती विजपंपाचे थकबाकी वीज बिल योजनेच्या माध्यमातून भरावे असे आवाहन सहाय्यक अभियंता नीलेश महाजन यांनी केलेले आहेत.