नंदुरबार जिल्हा परिषदेत लघु सिंचन विभागातील कनिष्ठ सहाय्यकास अडीच हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले...लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या धडक कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले*
नंदुरबार दि.२३(प्रतिनिधी) नंदुरबार जिल्हा परिषदेतील लघु सिंचन विभागातील कनिष्ठ सहाय्यक यांना २५०० रुपयांची लाच स्वीकारतांना लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने जि.प.विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
*याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचे भाऊ यांना सन 2018-19 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील विविध ठिकाणी लघु बंधारे बांधकामाचे काम मिळाले होते. सदरचे बंधारे बांधकामाचे काम 2019 मध्ये पूर्ण झाले असून सदर कामांच्या बिला मधून 10% कपात केलेली सुरक्षा अनामत रक्कम जिल्हा परिषद विभागामार्फत काढून देणे करिता गुप्तेश चंद्रकांत लघु सिंचन विभागातील कनिष्ठ सहाय्यकजिल्हा परिषद नंदुरबार, जि. नंदुरबार यांनी तक्रारदार यांच्याकडून 2500/ रुपये लाचेची मागणी दि.22.11.2021 रोजी करून आज दि.23.11.2021 रोजी पंच व साक्षीदारांसमोर लाचेची रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे, तरी कनिष्ठ सहाय्यकास यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला आहे
हि कारवाई
मा. श्री. सुनील कडासने, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक,मा. श्री. सतीश भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक (अति.कार्यभार) ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
श्री सुनील कुराडे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि., धुळे (अति.प्रभार नंदुरबार.) यांच्या मार्गदर्शनाखाली
सापळा अधिकारी:-*
पोलीस निरीक्षक, समाधान म. वाघ, ला.प्र.वि., नंदुरबार
सह सापळा अधिकारी:-*
पोलीस निरीक्षक, माधवी स. वाघ, ला.प्र.वि, नंदुरबार
यांच्या नेतृत्वाखाली
पोहवा/उत्तम महाजन, पोहवा/विजय ठाकरे, पोना/ दिपक चित्ते, पोना/मनोज अहिरे, पोना/ संदीप नावाडेकर, पोना/देवराम गावित, मपोना/ज्योती पाटील, चापोना/महाले व पोहवा/संजय गुमाने सर्व नेम. ला.प्र.वि., नंदुरबार. यांनी केली या घटनेने परिसरात लाच घेणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे