अहो आता भरोसा ठेवायचा कुणावर..!आमडदे येथे बँकेत दरोडा दीड कोटींचे दागिने चोरी..कुंपनच शेत खातेय का असे तर्क वितर्क.


 

अहो आता भरोसा ठेवायचा कुणावर..!आमडदे येथे बँकेत दरोडा दीड कोटींचे  दागिने चोरी..कुंपनच शेत खातेय का असे तर्क वितर्क..!*
भडगाव दि.२३(प्रतिनिधी): तालुक्यातील आमडदे येथे मध्यरात्री दरोडा पडल्याची घटना घडली, घटनेची माहिती बँकेतील कर्मचाऱ्यांनी दिली असता जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा कामाला लागली, व श्वान पथकाला घेऊन तपास यंत्रणा सुरू झाली, बँकेतील CCTV कॅमेरे दोन दिवसांपासून बंद असल्यामुळे या घटनेत कुंपनच शेत खातेय का असे तर्क वितर्क लढविले असता बँकेतील काही कर्मचाऱ्यांच्या भोवतीच संशय बळावला,
अधिक माहिती वरून कर्मचाऱ्यांच्या भोवती संशयाचे धागेदोरे उलगडू लागले व सुमारे दोन कोटी रुपयांची दागिने जवळच असलेल्या विहिरीत आढळून आले ?
अधिक तपासासाठी संशयित कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून, जवळपासच्या परिसरातील कुणाचा हस्तक्षेप आहे ?  आणखी काही माहिती हाती मिळते का? याची चौकशी युद्धपातळीवर सुरू आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने