*अनिल देविदास नंन्नवरे यांना राज्यस्तरीय समाजरत्न 2021 पुरस्कार प्रदान*
जळगाव दि.२३(प्रतिनिधी):-आदिवासी कोळी जमातीचा गौरवांकित इतिहास विरंगना झलकारीबाई कोळी जयंती उत्सवानिमित्त राज्यस्तरीय जीवन गौरव,कार्य गौरव व समाजरत्न पुरस्कार सोहळा 22 नोव्हेंबर 2021 रोजी राजश्री शाहु नाट्य मंदिर पारोळा रोड,धुळे येथे विरंगना झलकारीबाई कोळी, स्ञी शक्ती सामाजिक संस्था,धुळे व आदीवासी टोकरे कोळी वाल्ह्या सेना गृप खांदेश यांनी आयोजित केला होता.
राज्यभरातून समाजात विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल हे पुरस्कार दिले जातात श्री.अनिल नंन्नवरे हे जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवीत असतात सन 2010 पासून प्रत्येक वर्षी खांदेशातील एक हजार पाचशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करतात तसेच गरीब घरातील इयत्ता 10 वी व 12 वी चे चार विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतात तसेच आदीवासी पाड्यांवर जाऊन गोरगरीब व मागासलेल्या कुटुंबीयांना किराणा साहीत्य वाटप करतात.
कोरोणा काळात अनिल नंन्नवरे व त्यांच्या सहकार्यांनी कोरोणा झालेल्या रूग्नांना स्वतःच्या वाहनातून रूग्नालयात दाखल करून परत घरी सोडलेले आहे.रस्त्यावर फूटपाथवर वास्तव्यास असणारे तसेच बस स्टैंड व रेल्वे स्टेशन परिसरातील बेघर लोकांना अन्नदान कार्यक्रम आयोजित केले आहेत.कर्तव्यावर कर्मचारीवर्गाला व नागरिकांना एक हजार मास्क, ग्लुकोज बिस्किट व पाचशेहून जास्त मिनिरल वाॅटर बाॅटल वाटप करण्यात आल्या आहेत तसेच कोरोणा संसर्ग होऊन मयत झालेल्या परिवारांना आर्थिक मदत केलेली आहे या कार्याची दखल घेऊन जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन च्या वतीने आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कार्याबद्दल जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.ना.श्री.उन्मेषदादा पाटील यांनी कोरोणा योद्धा पुरस्कार देऊन अनिल नंन्वरे यांना गौरविण्यात आले आहे.
धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ात शालेय साहित्य वाटप केले असून वाघाडी,ता.शिरपूर येथील स्मीथ केमीसिंथ केमिकल फॅक्टरीत स्फोट होऊन मयत झालेल्या दोन कुटुंबीयांना आर्थिक मदत केली आहे तसेच शिंदखेडा तालुक्यातील वर्षी गावातील एक गरीब विधवा बघीणीला व्यवसाय करण्यासाठी दुकान टाकून दिले आहे.
माजी आमदार स्व.कांतजी कोळी साहेब यांचे स्मृतीपित्यर्थ दत्तक योजना चालू केली असून जळगाव येथील आरंभ प्रतिष्ठान संस्थेच्या दोन एच. आय.व्ही.पाॅझिटीव्ह बालकांची शिक्षणाची जबाबदारी अनिल नंन्नवरे यांनी घेतली आहे व असे कितीतरी उपक्रम ते राबवीत असतात या कार्याची दखल घेऊन विरंगना झलकारीबाई कोळी, स्ञी शक्ती सामाजिक संस्था,धुळे व आदीवासी टोकरे कोळी वाल्ह्या सेना गृप खांदेश यांनी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले.
श्री.अनिल देविदास नंन्नवरे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अखिल भारतीय कोळी समाज नवि दिल्ली (रजि.) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.श्री.परेशभाई कांतिजी कोळी,श्री.सिद्धार्थ दादा कोळी,जळगाव जिल्हा पालमंञी मा.ना.गुलाबरावजी पाटील, जि.प.सदस्य श्री.प्रतापभैया पाटील,आदिवासी कोळी समाज समन्वय समितीचे अॅड. शरदचंद्र जाधव साहेब, बांभोरी उपसरपंच श्री.भिकन दादा नंन्नवरे,धरणगाव प.स.चे माजी उपसभापती श्री.रविशेठ नंन्नवरे,मा.सरपंच श्री.गोपालशेठ नंन्नवरे,सामाजिक कार्यकर्ता श्री.अनिल शेठ नंन्नवरे,श्री.धनराज साळूंके,श्री.राहूल रायसिंग, श्री.प्रविणकुमार बाविस्कर, श्री.योगेश बाविस्कर,श्री.गोपाल गुरूजी,श्री.विजय बाविस्कर,शिरपूर येथील नगरसेवक श्री.चंद्रकांत सोनवणे,श्री.सुभाषदादा कोळी,श्री.अॅड.पी.सी.चौधरी,श्री.राजेन्द्र चौधरी,श्री.ज्ञानेश्वर पाटील,श्री.अजय नंन्नवरे,श्री.चंद्रभान नंन्नवरे,श्री.लोकेश नंन्नवरे,श्री.रविंद्र नंन्नवरे,श्री.अविनाश सोनवणे,श्री.सचिन बाविस्कर, श्री.अक्षय मोरे आदींनी अभिनंदन केले आहे.