वयाच्या ७५ व्या वर्षी बांधली सुलग्नाची गाठ..*कोळी समाज वधू-वर मंडळातर्फे वयोवृद्ध जोडप्याचे झाले शुभमंगलम .. मुलींच्या दुष्काळातही चांगल्या कार्याच्या जोरदार वयोवृद्ध बाबांचा सुकाळ..!
*चोपडादि.२६(प्रतिनिधी)* येथील सूतगिरणीचे माजी संचालक,कोळी समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक,भुसावळ रेल्वे विभागातील सेवानिवृत्त अभियंता लखिचंद श्रावण बाविस्कर(वय ७५ वर्षे,रा.वडगांवसिम,ह.मु.चोपडा) यांच्या पत्नी सौ.कस्तुराबाई बाविस्कर(वय ७० वर्षे) यांचे कोरोणाकाळात हृदयविकाराने दुःखद निधन झाले होते.श्री.व सौ. बाविस्कर यांना मुलबाळही नव्हते.वृद्धापकाळात पत्नीचे निधन झाल्याने श्री.बाविस्कर विधुर म्हणुन एकाकी जीवन जगत होते.अशातच नातेवाईकांकडून त्यांना दुसरे लग्न करण्याचा आग्रह सुरू झाला.पण ह्या वयात लग्नासाठी दुसरी स्री मिळणे मुश्कील असताना त्यांच्या प्रयत्नांना कर्मधर्म संयोगाने यश आले.मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील रहिवासी श्रीमती.सुरेखा रामदास भोलाणे (वय ५० वर्ष) ह्या पहिल्या लग्नानंतर पतीचे निधन झाल्याने दुसरे लग्न न करता विधवा म्हणुन जिवन जगत होत्या.त्यांनाही मूलबाळ नव्हते.दोघांकडून प्रमुख नातेवाईकांच्या संमतीने तरसोद येथील श्री गणपती मंदिरात या दोघं वयोवृद्ध व्यक्तिंचे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सुलग्न लावण्यात आले.अशी माहिती चोपडा म.वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी हया पत्रकान्वये दिली आहे.
विशेष असे की, लखिचंद बाविस्कर हे गेल्या २०/२२ वर्षांपासून भुसावळ येथील कोळी समाज विकास संस्था संचलित वधू-वर सूचक मंडळाचे संचालक आहेत.ते दरवर्षी नवीन व उपवर-वधूंना सुयोग्य स्थळ सुचवून लग्न जमवितात. समाजात जुन्या चालीरिती, रुढी परंपरा याबाबत माहिती देतात,जात व वैधता प्रमाणपत्र,इनाम वर्ग ६ ब च्या जमिनींवर कलम ३६ व ३६ अ ची आदिवासी खातेदाराची नोंद करणे बाबत मार्गदर्शनही करतात.तसेच श्रीमती.सुरेखा भोलाणे यांनाही अाध्यात्मिक,धार्मिक कार्याची आवड असल्याने या दोघांत सुलग्नाचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे.समाजात त्यांच्या ह्या निर्णयाचे स्वागत होत आहे. समाजात कोणीही एकाकी जीवन न जगता विधुर व विधवा झालेल्या व्यक्तींना या वयातही चांगला जीवनसाथी मिळू शकतो,हे भुसावळ येथील कोळी समाज वधु वर सूचक मंडळाने सिद्ध करून दाखविले आहे.म्हणूनच मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री.व सौ.सुरेखा लखिचंद बाविस्कर यांचा पुन्हा शुभमंगल विवाह सोहळा उत्साहात संपन्न करण्यात आला.या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, उपाध्यक्ष नितीन सोनवणे, सचिव वसंत सपकाळे, खजिनदार अभिमन्यू सोनवणे,सहसचिव चंद्रकांत सूर्यवंशी,अंतर्गत हिशोब तपासणीस प्रकाश सपकाळे, सदस्य वसंत मोरे,दिलीप कोळी,शांताराम कोळी,बन्सी मोरे,रवींद्र बाविस्कर,विजय तावडे,धर्मराज तायडे,हेमंत कोळी,तसेच जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, माजी समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, गटनेते व जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे,उद्योजक गोपाल तायडे,माजी नगरसेवक भिमराज कोळी, यांचेसह शेकडोंच्या संख्येने कोळी समाजबांधव उपस्थित होते.