अदखलपात्र गुन्ह्यातील चॅप्टर केस मधून दोन्ही मुलांची नावे कमी करण्यासाठी हवालदाराने घेतली १५ हजाराची लाच

 अदखलपात्र गुन्ह्यातील चॅप्टर केस मधून दोन्ही मुलांची नावे कमी करण्यासाठी  हवालदाराने घेतली १५ हजाराची लाच



म्हसावद ता.शहादा दि.२५ (प्रतिनिधी):

मोलगी ता . अक्कलकुवा येथे चॅप्टर केस संदर्भात 11 हजार रुपयांची लाच घेताना मोलगी पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार रंगेहात पकडला गेला . यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे .

याबाबत अधिक माहिती अशी की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार एक व्यक्ती आणि त्याची दोन्ही मुले यांच्यावर जमिनीच्या वादातून अदखलपात्र गुन्हा दाखल आहे . या अदखलपात्र गुन्ह्यातील चॅप्टर केस मधून दोन्ही मुलांची नावे कमी करण्यासाठी मोलगी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रकाश सिताराम मेढे ( वय 43 वर्ष ) यांनी त्या व्यक्तीकडे 15,000 रुपये लाचेची मागणी केली . याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या व्यक्तीने तक्रार दिली . दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दि.25 नोव्हेंबर रोजी दुपारी सापळा रचला . त्यावेळी तडजोडीअंती 11 हजार रुपये पंचासमोर हवालदार मेढे यांनी स्वीकारले . म्हणून लगेचच पकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने ( नाशिक परिक्षेत्र , नाशिक ) , अप्पर पोलीस अधीक्षक सतीश भामरे , ( अति कार्यभार ) व पोलीस उपअधीक्षक , धुळे ( अति . कार्यभार नंदुरबार ) सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक माधवी समाधान वाघ यांनी हवालदार उत्तम महाजन , विजय ठाकरे , नायक दिपक चित्ते , अमोल मराठे , महिला पोलीस नायक ज्योती पाटील या पथका समवेत कारवाई केली .

आज दि. 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई चालू होती .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने