जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (JDCC) बँकचे नवनिर्वाचित ,संचालक श्री विनोद दादा पाटील (देशमुख ) यांचा किनगाव येथे भव्य नागरी सत्कार
मनवेल ता,यावल दि.२६( प्रतिनीधी) किनगाव दोन्ही ग्रामपंचायत तसेच विविध कार्यकारी सोसायटी व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी JDCC चे नवनिर्वाचित संचालक श्री.विनोद दादा पाटील (देशमुख) यांचा सत्कार करण्याचा योग आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय शशिकांत दादा पाटील आणि मा.श्री.अनिल नाना साठे यांच्यामुळे आला आणि स्वयंदीप प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आदरणीय श्री रामचंद्र विष्णू चौधरी यांच्या आग्रहामुळे मनोगत व्यक्त करून शुभेच्छा ही देता आल्या याबद्दल संबंधितांचे मनस्वी आभार.
पंचक्रोशीतील किनगाव ,डांभुर्णी ,गिरडगाव ,चिंचोली आडगाव कासारखेडा, नायगाव ,मालोद , उंटावद अशा गावातूनही विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी तसेच ग्रामपंचायतचे सरपंच तसेच सदस्य आणि प्रसारमध्यांचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांनीही नवनिर्वाचित संचालक आदरणीय श्री विनोद दादा पाटील (देशमुख )यांचा यथोचित सन्मान याप्रसंगी केला..
या कार्यक्रमाचे अध्यक्ष यावल चे माजी आमदार आदरणीय श्री.रमेश विठ्ठल चौधरी होते तर मंचावर नानासाहेब विजय पाटील माजी उपायुक्त अन्न व औषध विभाग ,जळगाव जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती मा.श्री.रवींद्र सूर्यभान पाटील ,मा.श्री.प्रदीप (सतीश)दादा देशमुख ,यावल पस चे सदस्य आबासाहेब उमाकांत पाटील,राष्ट्रवादी चे विधानसभा क्षेत्र प्रमुख मा.श्री.अनिल नाना साठे ,मा.श्री.रामचंद्र विष्णू चौधरी आणि सत्कारमूर्ती व JDCC चे नवनिर्वाचित संचालक आदरणीय विनोद दादा पाटील(देशमुख) व अन्य क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली..