*चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गुणगौरव सत्कार समारंभ व धम्मदिक्षा समारंभ संपन्न*
चोपडा दि.२(प्रतिनिधी) येथे दिनांक ३१/१०/२०११ रविवार रोजी जळगाव जिल्हाशाखा पूर्व अंतर्गत चोपडा शहर व चोपडा तालुका भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षांत समारंभाचे व गुणगौरव प्राप्त केलेल्या सत्कारार्थीचा गौरव व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन अशोका बुद्धविहार येथे करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी भंन्ते महाथेरो वंज्जिस यांच्या हस्ते सुमारे शंभर कुटुंबांना बौद्ध धम्माची दिक्षा देण्यात आली व त्यांच्या हस्ते दिक्षांत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष आयु. बापुराव गिरधर वाणे यांनी स्वीकारले तसेच या कार्यक्रमास प्रमुखअतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आयु. शैलेंद्र जाधव, अशोक राजाराम बाविस्कर नगरसेवक चोपडा, डी.एस आबा सोनवणे माजी प्राचार्य प्रताप विद्या मंदिर चोपडा, तुकाराम बाविस्कर माजी उपसभापती चोपडा, गोपाळराव सोनवणे माजी सभापती पंचायत समिती चोपडा, प्राध्यापक एम बी हांडे माजी उपप्राचार्य चोपडा, हितेंद्र बिरबल मोरे जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासभा तथा मुख्याध्यापक कस्तुरबा माध्यमिक विद्यालय चोपडा, संतोष जिभाऊ अहिरे सामाजिक कार्यकर्ता चोपडा, हे या कार्यक्रम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक शहराध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ यांनी केले प्रास्ताविकामध्ये बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या तमाम बौद्धांची मातृसंस्थेचे सुरुवातीपासूनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच द्वितीय अध्यक्ष भैय्यासाहेब आंबेडकर व राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मिराताई आंबेडकर यांनी चालवलेल्या या संस्थेचे कार्याबाबत व चोपडा तालुक्यांत सुरु असलेल्या कार्याचा संपूर्ण लेखा-जोखा भरत शिरसाठ यांनी प्रास्ताविकेत मांडला .
कार्यक्रमात भंन्ते महाथेरो वंजिस यांनी सर्व बौद्ध उपासक,उपासिका यांना धम्मदेसना व २२ प्रतिज्ञा दिल्या .प्रमुख अतिथी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात ज्यांनी ज्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गुणगौरव व संविधानाची प्रतिमा भेट देवून सन्मान करण्यात आला .
सत्कारार्थी पुढीलप्रमाणे -आशा पंडित गजरे (आरोग्यसेवेत बाबत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त) भरत भिमराव शिरसाठ( शैक्षणिक क्षेत्रात राज्यस्तरीय गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१प्राप्त) भगवान उर्फ छोटूभाऊ वाडे यांना (शासनाचा कोरोनायुद्ध पुरस्कार प्राप्त) संजय श्रीपत साळुंखे सर (सेट परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल) आधार छगन पानपाटील (आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त) हितेंद्र बिरबल मोरे (मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दल ) भिवराज रामदास रायसिंग (महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त) महिंद्र बळीराम सोनवणे यांना (एलआयसी मध्ये उत्कृष्ट विमा प्रतिनिधी म्हणून पुरस्कार प्राप्त ) रमेश गोबा सोनवणे ( ग्रामपंचायत सदस्यपदी नियुक्ती)तसेच विविध क्षेत्रामध्ये कार्य केलेल्या १० सत्कारार्थीचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष बापूराव गिरधर, शहराध्यक्ष भरत शिरसाठ, उपाध्यक्ष छोटूभाऊ वारडे, सुदाम ईशी, पूर्णानंद वाडे,जानकीराम सपकाळे, रमेश गोबा सोनवणे, देवानंद वाघ, संजय साळुंखे, रामचंद्र आखाडे, दिपक मेढे, सुखदेव बाविस्कर,ओकार जाधव, प्राध्यापक सपकाळे, प्राध्यापक हांडे, प्राध्यापक सोनकांबळे, निलेश सांळुखे, तसेच महिला .मंडळातून सुनिता सपकाळे, अंकिता भालेराव, उषा बाविस्कर, संगिता शिरसाठ, प्रज्ञा शिरसाठ, दिक्षा शिरसाठ, प्रणाली शिरसाठ यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रामचंद्र आखाडे यांनी केले. तर आभार देवानंद वाघ यांनी मानले .