यावल तालुका कोळी समाज बांधवाची उद्या यावल येथे महत्त्वाची बैठक
मनवेल ता.यावल दि.२(प्रतिनिधी): यावल तालुक्यातील सर्व आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवांची ०७ नोव्हेंबर वार रविवार रोजी संत नगरी शेगाव येथे लोकनेते तथा मा.मंत्री डॉ.दशरथजी भांडे साहेबांच्या नेतृत्वात होत असलेल्या आपल्या जमातीचे महाअधिवेशना निमित्त तालुक्यातुन अधिवेशनात जाण्यासाठी चे नियोजना संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण बैठक दि ०३/११/२०२१ वार बुधवार रोजी सकाळी ११वा. समाजाचे जेष्ठ नेते तथा गटनेते मा.आप्पासाहेब प्रभाकरजी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. तरी तालुक्यातुन सर्व आदिवासी कोळी समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने जिनिंग प्रेस कार्यालय यावल येथे हजर रहावे असे आवाहन
श्री.जालंदर भाऊ कोळी (ता.अध्यक्ष आ.सं.समीती)
श्री.भैय्यासो, संदीप भाऊ सोनवणे(जि.सदस्य.आ.सं.समीती)
श्री.भरतभाऊ कोळी(ता.सदस्य.यावल)
श्री.राहुलभाऊ तायडे(सरपंच बामणोद)
श्री.प्रदिपभाऊ कोळी(सरपंच भालोद)
श्री.यशवंत पैलवान सपकाळे (सरपंच अंजाळा)
श्री.गोटूभाऊ सोळुंके (सरपंच कोळन्हावी)
श्री.खेमचंद कोळी(सरपंच पाडळसे)
सर्वश्री सरपंच भालशिव पिंप्री,पिंपरूड,लिधूरी,दूसखेडा,डांभुर्णी,डोनगाव याबरोबर समाजाचे तालुक्यातील सर्व सन्माननीय सरपंच, उपसरपंच, सदस्य व समाजातील सर्व विविध संघटनेत असलेले पदाधिकारी यांच्या मार्फत करण्यात आले आहे.