नेहरू युवा केंद्राची टाकरखेडा गावात स्वच्छता मोहीम*

 




*नेहरू युवा केंद्राची टाकरखेडा गावात स्वच्छता मोहीम*


शिंदखेडा दि.२(प्रतिनिधी रवि शिरसाठ)  :-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नेहरू युवा केंद्रामार्फत महास्वच्छता अभियान राबविण्यात आली. 

        टाकरखेडा गावात नेहरू युवा केंद्रामार्फत प्रत्येक चौकात तसेच किराणा दुकान, हॉटेल,इतर सार्वजनिक ठिकाणी सिंगल युज  प्लास्टिक कचरा  गोळा करण्यासाठी नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेविका वर्षा पानपाटील यांनी सर्व दुकानदारांच्या व हॉटेलच्या  मालकांना मार्गदर्शन करून सिंगल युज प्लास्टिक ऑक्सो बायोडिग्रेडेबल कचरा पिशव्यामध्ये गोळा करून ठेवण्याचे मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे सर्व सार्वजनिक  असलेले व्यावसायिकानी पिशव्यांमध्ये प्लास्टिक गोळा करून ठेवले.आज स्वयंसेविका वर्षा पानपाटील यांनी सर्व ऑक्सो बायोडिग्रेडेबल कचरा पिशव्या  एकत्र करून संकलित केलेला सिंगल युज प्लास्टिक विल्हेवाट लावण्यासाठी टाकरखेडा ग्रामपंचायत चे सरपंच श्रीमती बालुबाई मालचे  तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आर.डी. ठाकरे, सी.चव्हाण,पंडित पानपाटील,मंगल कुवर ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याकडे गोळा केला केलेला कचरा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंचाकडे  यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टाकरखेडा गावातील सर्व लोकांनी या प्लास्टिक मुक्त स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन या कार्यक्रमाला यशस्वी पार पाडला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने