*बामखेडा त.त.येथे टोकरे कोळी वाडा फलकाचे अनावरण*
बामखेडा (प्रतिनिधी. )
सामाजिक प्रबोधन समिती, नंदुरबार(महाराष्ट्र) यांच्या वतीने मौजे बामखेडा त. त. येथे महर्षी वाल्मीकी राम मंदिराच्या आवारात मोठ्या संख्येने टोकरे कोळी जमातीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असून महामार्गावर लागत टोकरे कोळीवाडा, बामखेडा फलकाच्या अनावरण समाजाचे पहिले शहीद भटूभाऊ कुवर यांची पत्नी श्रीमती भावनाताई कूवर यांच्या हस्ते टोकरे कोळी वाडा फलकाचे अनावरण करण्यात आले.
प्रबोधन समिती, शहादा मार्फत प्रमुख वक्ते श्री. हेमंत सूर्यवंशी, यांनी टोकरे कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे कायदे व त्यातील सर्व अडचणींवर उपाय सुचवत असताना जमातीच्या चालिरीतीवर मार्गदर्शन केले.
टोकरे कोळी जमातिकडे मानिव दिनंकाचे सर्व पुरावे असताना जे अधिकारी मनमानी कारवाही करीत नागरिकांना जातीय अधिकारापासून वंचित ठेवतील त्यांना व यात जे कोणी राजकीय षडयंत्र करतील त्यांना आता ही जमात माफ करणार नाही. संविधानानुसार जमातींना देण्यात आलेल्या जातीय अधिकारासाठी भव्य आंदोलन तथा उच्च न्यायालयात जाण्यास समाजाची सर्व तयारी असल्याचे चर्चा करण्यात आली.
टोकरे कोळी जमातीचे मतांच्या व संख्येच्या आधारे नंदुरबार जिल्हा आदिवासी घोषित झाला असून मात्र प्रत्यक्षात या जमातीला लाभ देताना शासन व प्रशासन अन्याय करीत असल्याने यापुढील सामाजिक व राजकीय दिशा समाज हिताच्या दृष्टिकोनातून उभारण्याचा ठराव सर्वानुमते पास करण्यात आला.
महर्षी वाल्मीकी राम मंदिराच्या बांधकामासाठी पंचक्रोशीतून आलेल्या नागरिकांनी सढल हाताने दान दिले असून यात श्रीमती सौ.अरुणाबाई जयसिंग पवार,पंचायत समिती सदस्य,श्री. उखा भील,रतीलाल महाले,धर्मा भील,पांडू वडार, हेमंत सुर्यवंशी,बाळू इशी,खंडू सोनवणे,आदी.मदत केली आहे. सदर मंदिर तालुक्यातील पर्यटन तथा तीर्थक्षेत्र ठरेल, अशी नागरिकांची इच्छा व्यक्त करण्यात आली. त्या दिशेने मार्गक्रम करण्याचे ठरविण्यात आले.
यातून जिल्ह्यातील समाजामध्ये कमालीची ऊर्जा निर्माण झाली आहे, कारण समाजातील प्रथम शहीद भटुभाऊ कुवर याचे मोठे बंधू दशरथ आबा कुवर, यांनी समाजाला एक होण्याचे आव्हान केले.
या कार्यक्रम प्रसंगी किरण सोनवणे सह गणेश कुवर, कृष्णा कोळी, राकेश कुवर, दिलीप बोरसे, गणेश सोलंकी, दिनेश कोळी, जगण शिरसाठ, संजय सोनवणे,राकेश महाले,सचिन सोनवणे,राजेंद्र वाघ, किशोर चित्ते,जीवन वाघ,नामदेव निकुम, दगा वाघ,आनंद सोनवणे, दादाभाऊ साळुंके,प्रकाश कुवर,रामदास मंडळे,राजेंद्र वाघ,खुशाल महाले,संजय वाकडे,राकेश शिरसाठ,ज्ञानेश्वर महाले,गणेश सोनवणे, जीवन सोनवणे, पिरन शिरसाठ,सचिन बोरसे,शिवाजी ईशी,रवींद्र इशी,पुंडलिक बागुल, लीलाचंद बोरसे,सुनील ईशी, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.