शेतीत पुर्ण ओल असल्याने रब्बी पिकांच्या पेरणीस सुरूवात..*
*चोपडा दि.२(प्रतिनिधी)* तालुक्यात ह्या वर्षी उशिराने का होईना पण भरपुर पावसाळा झाल्यामुळे जमिनीत खोलवर ओलसरपणा असल्याने शेतकर्यांकडुन शेती तयार करून रब्बीची हरभरा,दादर पेरणीची लगबग सुरू झाली आहे.नारोद शिवारातील शेतकर्यांनी ट्रेक्टरवरिल पेरणी यंत्राद्वारे हरभरा,दादर बियाण्याची पेरणी करण्यास सुरूवात झाली आहे.दरवर्षी दसरा व नवरात्रीच्या दिवसात रब्बीच्या पेरणीस सुरूवात होत असते.पण ह्यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे शेती मशागत सुध्दा उशिराने झाली आहे.म्हणुन शेतकर्यांनी हरभरा,दादरची पेरणी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सुरू केली आहे.ह्यावर्षी जमिनीत पुर्ण ओलसरपणा असल्याने रब्बीची कोरडवाहु पिके सुध्दा चांगली तरारून येतील असा विश्वास अनुभवी शेतकर्यांमधुन बोलला जात आहे.