महावितरण विरोधात वर्डी फाट्यावर आंदोलन
वर्डी,ता.चोपडा दि.१८(प्रतिनिधी)महावितरणच्या अनागोंदी कारभाराला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी माजी जि.प.सदस्य विजय पाटील यांच्या नेतृत्त्वात वर्डी फाटा येथे रास्तारोको आंदोलन केले.
वर्डी सबस्टेशन ते ३३/११ मध्ये ५ एम. व्ही. ट्रान्सफॉर्मर त्वरित मिळवा, सहा महिन्यापासून जळालेल्या बर्डी परिसरातील कृषी ट्रान्सफॉर्मर त्वरित मिळावे, चोरीला गेलेले रोहित्र त्वरित बसवावे, शासनाच्या आदेशानुसार फक्त एक बिल भरून शेतकऱ्यांना रोहित्र उपलब्ध करूनद्यावे, वर्डी ग्रामपंचायत हद्दीतील गावठाणची डीपी जळालेली आहे ती त्वरित बसवावी, शेतकऱ्यांना पूर्ण १२ तास वीज मिळावी अशा मागण्या शेतकऱ्यांनी मांडल्या. यासंदर्भात महावितरणचे अभियंता सुरज मंडोरे, अडावद पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण दांडगे यांना निवेदन देण्यात आले. शेतकरी नंदलाल पाटील, बंटी शिंदे, डॉ. कांतीलाल पाटील, काशिनाथ पाटील, दत्तात्रय पाटील, महेंद्र पाटील, लहु धनगर, सचिन डाभे, संदीप पाटील, विनोद धनगर, नंदलाल शिंदे, दिलीप पाटील, ईश्वर पाटील आदी उपस्थित होते. महावितरणने मागण्यांची त्वरीत दखल घेऊन समस्या सोडवावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.