आष्टी पोलीस स्टेशनचा लाचखोर पोलीस शिपाई अडकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.
दोन महिन्यात तीन पोलीस शिपाई लाचखोरीत अडकल्याने आष्टी पोलीस स्टेशनच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?
गडचिरोली- दि.१८(प्रतिनिधी चक्रधर ज्ञमेश्राम )
आष्टी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलीस नाईक सुरेश दुर्गे यांना नुकताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सात हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
सविस्तर वृत्त असे की 9 नोव्हेंबरला भांडणासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रकरणातील गैरअर्जदारावर कारवाई करण्यासाठी पोलीस नाईक सुरेश दुर्गे यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोडअंती लाचेची रक्कम सात हजारावर ठरली होती त्या अनुषंगाने सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस नाईक सुरेश दुर्गे यांना रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांनी दिली आहे.
दोन महिन्यांपूर्वी दारूच्या प्रकरणात दोन आष्टी पोलीस स्टेशनचे दोन पोलीस शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले होते. आता पुन्हा एकदा आष्टी पोलीस स्टेशन मधील कर्मचारी लाचखोरीत अडकल्याने आष्टी पोलीस स्टेशनच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.