आदिवासी कोळी समाज जमातीचे जात प्रमाणपत्र प्रकरणं स्विकारा.. अन्यथा ई सेवा केंद्रधारकांविरुध्द तीव्र आंदोलन
शिरपूर दि.१९(प्रतिनिधी हिराभाऊ कोळी)शहादा शहरातील महा ई सेवा केंद्रधारक तालुक्यातील आदिवासी कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी या जमातीचे लोक तालुक्यातील महा ई सेवा केंद्रात जातीचे प्रकरण सबमिट करण्यास गेले असता तालुक्यातील महा ई सेवा केंद्रधारक आदिवासी कोळी जमातीचे प्रकरणं सबमिट न करता उडवा उडवीचे उत्तरे देतात. त्यांना याबाबत जाब विचारला असता सेतु केंद्रचालक सांगता की आम्हाला तसा तोंडी आदेश प्रांत कार्यालयातुन आला आहे.. तरी आपणास सर्व आदिवासी कोळी समाजाच्या वतीने विनंती करण्यात येते की आपण महा ई सेवा केंद्रधारकांच्या मनामानी कारभार थांबवावा आणि अशा मुजोर महा ई सेवा केंद्रधारकांचे परवाने रद्द करण्यात यावे अशी मागणी आदिवासी कोळी समाजाच्या वतीने मा. प्रांतधिकारी शहादा यांच्याकडे करण्यात आली..यावेळी निवेदन देतांना श्री हेमंत सुर्यवंशी, हिराभाऊ कोळी, प्रशांत सूर्यवंशी, दिपक सावळे आदि उपस्थित होते..