चोपडयाचे राजकारण गोल गोल.. कुठे अन् कसंही फिरु शकतंय.. सभापती-उपभापती निवडीत असंही फिरलयं पातं*

 

चोपडयाचे राजकारण गोल गोल.. कुठे अन् कसंही फिरु शकतंय.. सभापती-उपभापती निवडीत असंही फिरलयं पातं*



चोपडा दि.१९(प्रतिनिधी): चोपडा पं. स. सभापती व उपसभापती पदांचा मौखिक करारानुसार कार्यकाळ संपला होता. दोन्ही पदांसाठी दि. १८ नोव्हेंबर वार गुरुवार रोजी दुपारी ३ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी राष्ट्रवादी पक्षातर्फे धानोरा येथील कल्पना दिनेश पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले व उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी पक्षातर्फे सुर्यकांत खैरनार व भाजपातर्फे भरत बाविस्कर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले सभापतीपदासाठी कल्पना पाटील ह्या बिनविरोध विजयी झाल्या तर उपसभापती पदासाठी सूर्यकांत खैरनार यांना उपस्थित अकरा सदस्यांपैकी सहा मते मिळाली.

त्यामुळे ते विजयी घोषित झाले राष्ट्रवादी पक्षाने शब्द पाळला नाही म्हणून निवडणूक प्रक्रियेतून भाजपाचे उमेदवार भरत बाविस्कर व भाजपाचे सदस्य व माजी सभापती आत्माराम म्हाळके सभागृह सोडून बाहेर निघाले व त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर सडेतोड टीका करत नाराजी व्यक्त केली. निवडणूक प्रक्रियेत १२ सदस्यांपैकी रामसिंग भिल्ल हे एकमेव सदस्य गैरहजर राहिले व शिवसेनेचे सदस्य मच्छिंद्रनाथ वासुदेव पाटील यांनी उपसभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सुर्यकांत खैरनार यांच्या पारड्यात मत टाकल्याने भाजपाच्या अक्षरश: त्रिफळा उडवला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचायत समिती सदस्यांनी दगाबाजी करत प्रा अरुणभाई गुजराथी यांच्या शब्दांच्या अवमान देखील केला माजी सभापती - आत्माराम म्हाळके......

पंस सभापती व उपसभापती निवडणुक संदर्भात •आज सकाळी ११ वाजता प्रा. अरुणभाई गुजराथी यांचे समवेत झालेल्या मिटिंगमध्ये ठरलेल्या •करारानुसार सभापतिपदासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या कल्पना दिनेश पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले व उपसभापती पदासाठी भाजपाचे भरत बाविस्कर यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. पण प्रत्यक्ष सभागृहात जेव्हा निवडणूक प्रक्रिया सुरुवात झाली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी दगाबाजी करत व विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. अरुणभाई गुजराथी यांच्या शब्दाचा अवमान देखील केला अशी टीका भाजपाचे माजी सभापती आत्माराम म्हाळके यांनी यावेळी केली. सेनेचे एम वी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करून भाजपाशी उघडउघड गद्दारी केली असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादी पक्षाने शब्द पाळला नाही.

भाजपशी दगाबाजी केली असून याचे पडसाद पुढील

निवडणुकात दिसतील. राष्ट्रवादीच्या खेळीला आम्ही

• बळी पडलो. राष्ट्रवादी पक्षाने केलेला खेळीचा आम्ही

निषेध व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वरिष्ठ

नेत्यांच्या शब्दाला कार्यकर्ते किंमत देत नाही अशी

टीका त्यांनी केली आहे...
भाजपाच्या खेळीचा राग आम्ही सभागृहात व्यक्त केला.... उपसभापती सुर्यकांत खैरनार यांचा गौप्यस्पोट....

पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी मागील काळात सभापती भाजपाच्या प्रतिभा पाटील व उपसभापती पदासाठी मी स्वतः होतो पण माझ्या उपसभापती पदाचा राजीनामा भाजपाने बळजबरीने घेण्यास भाग पाडले या गोष्टीचा राग काही सदस्यांना व मला देखील होता आणि तो राग आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून आज सभागृहात व्यक्त केला आणि दोन्ही पदे राष्ट्रवादी पक्षाला मिळाली याचा आम्हाला आनंद आहे. दगाबाजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजिबात केली नसून भाजपाने केली असल्याचा पनरुच्चार राष्ट्रवादी

पक्षाचे उपसभापती सूर्यकांत खैरनार यांनी केला आहे सदर निवडणुकीत सेनेचे एमवही पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पारड्यात मत टाकल्यामुळे त्यांनी सेनेच्या सदस्यांचे विशेष आभार मानले रागाचे प्रतीक म्हणून सदस्यांनी भाजपाच्या अक्षरच्या त्रिफळा उडविला असे सुर्यकांत खैरनार म्हणाले.राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सोबत शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अनिल गावीत यांनी काम पाहिले तर कायदा व सुव्यवस्थेचे काम चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण एपिआय अजित साळवे यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

निवडणूक प्रक्रिया दरम्यान पंचायत समिती आवारात • माजी आमदार कैलास पाटील, चोपडा 9 पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, माजी सभापती प्रतिभा पाटील, माजी सभापती आत्माराम म्हाळके, शिवसेना तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, नगरसेवक किशोर चौधरी, युवा सेनेचे गोपाल चौधरी, सुनील पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शेतकी संघाचे संचालक हिम्मतराव पाटील, हरीश पवार यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपाचे पदाधिकारो व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते........

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने