शेतकरी विरोधातील काळे कायदे रद्द झाल्याने देशभरातील शेतकऱ्यांचा विजय दिवस म्हणून शिरपूर येथे सर्व पक्षीय जल्लोष .*


 


*शेतकरी विरोधातील काळे कायदे रद्द झाल्याने देशभरातील शेतकऱ्यांचा विजय दिवस म्हणून शिरपूर येथे सर्व पक्षीय जल्लोष .*

 शिरपूर दि.२०( प्रतिनिधी हिराभाऊ कोळी):   आज दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ रोजी देशभरातील शेतकऱ्यांचा विजय दिवस म्हणून शिरपूर येथे सर्व पक्षीय जल्लोष साजरा करताना राजकीय, सामाजिक,किसान सभा व इतर संघटनानी केंद्र सरकारने विश्वासात न घेता शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये तीन काळे कायदे संसदेमध्ये मंजूर करून शेतकऱ्यांवर लादण्यात आले होते.हे कायदे रद्द व्हावे यासाठी देशभरातील शेतकरी गेल्या अकरा महिन्यापासून आंदोलने उपोषणे भारत बंद दिल्लीच्या सीमेवर आंदोलन विविध स्तरावर करत होते आज केंद्रातील मा.नरेंद्र मोदी यांना स्वतः तीनही कायदे रद्द करण्याची घोषणा करावी लागली.

या कायद्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अडाणी -आंबनीचे हित होणार होते. 

यासाठी देशभरातील शेतकरी  एकत्रस्वरूपात आंदोलन करत होते या आंदोलनामध्ये देशभरातील शेतकरी आडवे आले.या तीनकाळे कायद्याच्या गेल्या वर्षभरापासून शिरपूर तालुक्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष ,शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ,काँग्रेस पक्ष ,प्रहार संघटना,शेतकरी फाउंडेशनच्या इतर सर्व संघटनांच्या माध्यमाने वेळोवेळी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले.

तिन्ही काळे कायदे रद्द झाल्याने आज शिरपूर शहरात जल्लोष करण्यात आला.

आणि आजचा दिवस शेतकरी विजय दिवस म्हणून साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी करून  जय जवान ,जय किसान या घोषणा देण्यात आल्या.यावेळी जेष्ठ नेते ऍड.मदन परदेशी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्री.रमेश  करनकाळ,काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्री.अभिमन भोई, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत,प्रहाचे ईश्वर बोरसे ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.निलेश गरुड,शिवसेना तालुका प्रमुख इंजि.अत्तरसिंग पावरा,काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री.उत्तम बापू माळी,धुळे जागरण मंचाच्या डॉ.सरोज पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते श्री.हेमराज राजपूत,युवराज राजपूत,हिराभाऊ कोळी,शेतकरी फाउंडेशनचे गोपाल राजपूत,किसान सभेचे ऍड.संतोष पाटील युवासेना युवधिकारी विजय पावरा,दिनेश गुरव,सचिन पावरा,किसान समन्वय समितीचे व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने