वेळे अभावी माघारी न झाल्याने जे.डी.सी.सी. बॅंक निवडणूकीतून अनुसूचित जमाती मतदार संघातील उमेदवार नामदेव भगवान बाविस्कर यांचा धडाकेबाज उमेदवार शामकांत बळीराम सोनवणे सोनवणे जाहिर खुला पाठींबा*



 



*वेळे अभावी माघारी न झाल्याने जे.डी.सी.सी. बॅंक निवडणूकीतून अनुसूचित जमाती मतदार संघातील उमेदवार नामदेव भगवान बाविस्कर यांचा  धडाकेबाज उमेदवार शामकांत बळीराम सोनवणे सोनवणे जाहिर खुला पाठींबा*

चोपडा दि.११ (प्रतिनिधी)जे.डी.सी.सी. बॅंक निवडणूकीतून अनुसूचित जमाती मतदार संघातून नामदेव भगवान बाविस्कर यांची उमेदवारी वेळे अभावी माघारी होऊ शकली नसल्याने त्यांनी या मतदार संघातील उमेदवार शामकांतदादा  बळीराम सोनवणे यांना जाहीर पाठिंबा एका पत्रकान्वये दिला आहे.

नामदेव बाविस्कर यांनी मतदार राजाला जाहिर आवाहन करून सांगितले आहे की,  माझी उमेदवारी जिल्हा बँकेसाठी (राखीव) अनुसूचित जमातीत उमेदवारी केलेली होती. परंतु माघारीस आलो असता वेळे अभावी (टाईम 3.05) वाजता माझी माघार म. निवडणुक अधिकारी यांनी स्विकारली नाही.तरी या राखीव मतदार संघातील अनुसूचित जमातीतील उमेदवार श्री. शामकांत बळीराम सोनवणे यांना जाहिर पाठींबा देत असून स्वखुशीने या निवडणुकीसाठी मी श्री. शामकांत बळीराम सोनवणे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे तरी माझ्या हितचिंतक मतदार बांधवांनी आपले बहुमोल मतदान श्री. शामकांत बळीराम सोनवणे यांना  करावे अशी   विनंतीहीनामदेव भगवान बाविस्कर यांनी एका पत्रकान्वये केली आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने