शेगाव दि ११ : देशात व राज्यात मोठ्या प्रमाणावर असलेला आदिवासी कोळी समाज दुर्लक्षित असुन या समाजाला महाविकास आघाडी सरकार कडून न्याय हक्क मिळवून देईल असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी दिले
ते आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने संत नगरी शेगाव हाँटेल कृष्ण काॅटेज येथेअन्यायग्रस्तआदिवासी जमातींचे राज्यस्तरीय महाअधिवेशनप्रसंगी बोलतं होते.
महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त आदिवासी कोळी जमातींना आरक्षण असुन हि योजनांचा लाभ मिळत नसुन संघटनांच्या माध्यमातून लढा उभारणार व आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती राज्यातील सर्व अन्यायग्रस्त आदिवासी कोळी जमातींना त्यांचे आरक्षण, हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा उभारणार माजी कॅबिनेट मंत्री तथा आदिवासी लोक नेते *डॉ**दशरथजी* *भांडे* यांची घोषणा
राज्य सरकार आदिवासी कोळी जमातींच्या विकासासाठी नेहमी पाठीशी असुन आदिवासींच्या विकास योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल महिला व बालकल्याण मंत्री *नामदार* अँड .मा. *यशोमती* *ताई* *ठाकुर* यांनी प्रतिपादन केले.
सुरवातीला ह.भ.प. ज्ञानेश्वरजी भांडे महाराज मठधिपती सामदा काशीपुर व मान्यवरांच्या हस्ते भगवान महर्षी वाल्मिकी , संत गजानन महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
या राज्यव्यापी महाअधिवेशनात उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा. प्रल्हाद भाऊ सोनवणे यांनी उत्तर महाराष्ट्र विभाग जळगाव जिल्हा जळगाव महानगरातील अन्यायग्रस्त आदिवासी कोळी जमातींना एकसंघ करून समाजाचे मोठे संघटन डॉ दशरथजी भांडे साहेब यांच्या पाठीमागे उभे करण्याचा निश्चय केला
महाराष्ट्रातील टोकरे कोळी, कोळी महादेव मल्हार कोळी ढोर कोळी माना हलबा गोवारी मन्नेवार मनैरवारलू हरबी ठाकुर ठाकर डोंगर कोळी गोवारी इ.सह ३३ अन्यायग्रस्त आदिवासी जमातींचे एक दिवसीय भव्य ऐतिहासिक महाअधिवेशन दिनांक- ०७/११/२०२१ रविवार रोजी संत नगरीत हाँटेल कृष्ण काॅटेज येथे माजी कॅबिनेट मंत्री तथा आदिवासी लोक नेते मा. डॉ दशरथजी भांडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले
यावेळी सर्व आदिवासी कोळी जमातीच्या संमतीने समाजाच्या हिताचे पाच महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले
या महत्वपूर्ण महाअधिवेशनाला राज्याच्या महिला व बाल कल्याण विकास मंत्री नामदार अँड. यशोमती ताई ठाकुर, कांग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार मा. नाना भाऊ पटोले , भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आमदार संजय कुटे , माजी खासदार डॉ. उल्हास दादा पाटील , मुक्ताईनगर आमदार मा. चंद्रकांत भाऊ पाटील , आमदार मा.अमोल मिटकरी , जळगाव जिल्हा परिषद गट नेते मा. प्रभाकर अप्पा सोनवणे अमरावती विभागीय अध्यक्ष मा. भास्करराव कोलटके , कोर कमिटी अध्यक्ष मा. मनोहरराव बुध , अकोला जिल्हाध्यक्ष मा. प्रशांत भाऊ तराळे , मा. एकनाथराव जूवार , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा. प्रल्हाद भाऊ सोनवणे जळगाव जिल्हाध्यक्ष मा. नितीन भाऊ कांडेलकर , भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा. अशोक भाऊ कांडेलकर , मा. शरदचंद्र जाधव साहेब मा. रघुनाथराव इंगळे ,
आमदार मा. बळवंतराव वानखेडे , आमदार मा. राजेश एकडे , माजी आमदार मा. राहुल बोंद्रे, मा . दिलीप कुमार सानंदा , माजी पोलीस अधिकारी मा. वाकोडे साहेब , अँड मा . सुशांत येरमवार साहेब , मा. कर्नल गाले साहेब , अकोला जिल्हा परिषद सभापती मा. पंजाबराव वडाळ , मा . मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष मा. संजय भाऊ कांडेलकर , जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख मा . जगन बापू बाविस्कर , चोपडा मा . शंभू अण्णा शिवरे पाचोरा यांची प्रमुख उपस्थिती होती
या राज्यव्यापी महाअधिवेशनाला जळगाव आमदार मा . राजु मामा भोळे , पाचोरा आमदार मा. किशोर अप्पा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या
यावेळी सारेगामापा रिटेल चेंपियन कु . श्नूती भांडे , पागधरे मॅडम , सौ . बबिता ताई ताडे , यांचे मा . नाना भाऊ पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ,
या महाअधिवेशनाला
प्रल्हाद भाऊ सोनवणे यांच्या हस्ते आदिवासी वाल्मिक लव्य सेना संस्थापक अध्यक्ष मा . नाना भाऊ सोनवणे यांच्या वतीने जळगाव जिल्हाध्यक्ष मा. योगेश भाऊ बाविस्कर , शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मा. चिंतामण जैतकर व इतर पदाधिकार्यांनी जाहीर पाठिंबा दिला , राष्ट्रीय आदिवासी मन्नेरवारलू कल्याण सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा . डॉ . लक्ष्मीकांत जिरेवाड यांनीही पाठिंब्याचे पत्र दिले
यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा मा. सुनिता ताई कोळी , महिला जिल्हा मार्गदर्शक मा. रजनी ताई सोनवणे , कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष मा . मंगल भाऊ कांडेलकर मा . जगदीश भाऊ सोनवणे युवक जिल्हाध्यक्ष मा. प्रशांत भाऊ सोनवणे , सुभाष भाऊ देवराज , जळगाव महानगर युवक अध्यक्ष दिपक भाऊ सोनवणे उपाध्यक्ष भुषण भाऊ सपकाळे , रावेर तालुका अध्यक्ष मनोहर भाऊ कोळी , पाचोरा अध्यक्ष सचिन भाऊ कोळी , जळगाव तालुका अध्यक्ष अशोक भाऊ सपकाळे , धरणगाव तालुका अध्यक्ष कैलास भाऊ सोनवणे भुसावळ तालुका अध्यक्ष गणेश भाऊ सोनवणे , बोदवड तालुका अध्यक्ष जगदीश भाऊ कोळी , चाळीसगाव अध्यक्ष मा. बापू भाऊ कोळी , वढोदे सरपंच संदिप भैया सोनवणे पाडलसे सरपंच खेमचंद भाऊ कोळी, जळगाव महिला शहर अध्यक्ष मा. आशा ताई सपकाळे , मा. सविता ताई कोळी, मा. मालती ताई तायडे , एस टी सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचे दिलीप भाऊ इंगळे, ऋषी भाऊ कोळी, मा. विश्वनाथ भाऊ सोनवणे सचिव जिवन भाऊ तायडे सहसचिव राहुल भाऊ सपकाळे यांच्या सह उत्तर महाराष्ट्र विभाग जळगाव जिल्हा जळगाव महानगरातील सर्व अन्यायग्रस्त आदिवासी कोळी समाज बांधव कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
सर्व मान्यवरांचे ढोल वाजवुन स्वागत करण्यात आले सौ. खर्चाने ताई व दर्यापूर येथील मुलांनी आलंय आदिवासी वादळ हे आदिवासी नॄत्य जबरदस्त पध्दतीने सादर करून अधिवेशनाची शोभा वाढवली मा. दशरथ लोणकर , जगन्नाथ धुदळे वसंतराव तायडे , उन्हाळे गुरुजी, रवि भांडे , वंदनाताई जामनेकर , सौ आपोतीकर , यांनी परिश्रम घेतले