निमाणी सीटी बस स्टँडजवळ आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या 216 वी जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन


 


निमाणी सीटी बस स्टँडजवळ आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या 216 वी जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन


नाशिक दि.११(प्रतिनिधी)

 दिनांक 8 नोव्हेंबर 2021 रोजी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या 216 वी जयंतीच्या निमित्ताने मुर्ती पुजनाचा कार्यक्रम सकाळी 11.00 वाजता निमाणी सीटी बस स्टँड समोर विवीध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन "वीर भुमी पुत्र आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे युवा फाउंडेशन"चे संस्थापक मा श्री पृथ्वीराजभाऊ अंडे यांनी केले.
      या प्रसंगी माजी महापौर मा रंजना ताई भानसी शिवसेना नेते मा सुनिलभाऊ बागुल, नगरसेवक मा सुरेशमामा खेताडे, राजेंद्रभाऊ वाघले, नगरसेवक योगेशभाऊ शेवरे, आ.कोळी एकता मंचचे अध्यक्ष मा संजयभाऊ शिंदे, उपाध्यक्ष युवराजकाका सैंदाणे, कार्याध्यक्ष किसनभाऊ सोनवणे, खजिनदार गणेशभाऊ राजकोर आणि सर्व राजकीय व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
     

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने