नाशिक येथे अखिल भारतीय कोळी समाज परिषद नवी दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा कै कांतीभाई कोळी यांची श्रध्दांजली सभा*


 



*नाशिक येथे अखिल भारतीय कोळी समाज परिषद नवी दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा कै कांतीभाई कोळी यांची श्रध्दांजली सभा*

      नाशिक दि.११ (प्रतिनिधी)      नाशिक येथील कोळी समाज एकता मंच नाशिक शहर यांच्या वतीने सर्व नाशिक शहरातील समाज बांधवांच्या वतीने  "अखिल भारतीय कोळी समाज परिषद नवी दिल्ली"चे प्रदेश अध्यक्ष मा.आमदार,कै. मा. कांतीभाई कोळी यांचे दुःखद निधन झाल्यानंतर आपल्या नाशिक येथे श्रध्दांजली सभा घेऊन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.  या प्रसंगी कोळी समाज एकता मंचचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय कोळी समाज परिषद नवी दिल्लीचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय भाऊ शिंदे सरांनी भाईंच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच मा. कांतीभाई कोळी ठाण्याचे कित्येक वर्षे आमदार होते , 35 वर्षापासून अखिल भारतीय कोळी समाज परिषदेची धुरा त्यांनी सांभाळली, त्या काळात त्यांनी महाराष्ट्रात काना-कोपर्‍यात संघटना पोचवली. 

      या प्रसंगी कोळी समाज एकता मंचचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय कोळी समाज परिषद नवी दिल्लीचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री संजयभाऊ शिंदे, एकता मंचचे उपाध्यक्ष तथा कोळी महासंघाचे नाशिक शहर संपर्क प्रमुख युवराजकाका सैंदाणे, एकता मंचचे कार्याध्यक्ष तथा आदिवासी समन्वय समितीचे नाशिक जिल्हाध्यक्ष किसनभाऊ सोनवणे, एकता मंचचे खजिनदार तथा कोळी महासंघाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष गणेशभाऊ राजकोर, विजय कोळी सर, प्रविण सुर्यवंशी सर व समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने