*
नीट परीक्षेत महाविद्यालयात प्रथम आलेली सृष्टी सूर्यवंशीचा पालकांसह सत्कार करतांना अँड.संदीप पाटील,डॉ.स्मिता पाटील व पदाधिकारी.
चोपडा महाविद्यालयात नीट व एम एचटी-सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार*
चोपडाः दि.9(प्रतिनिधी)
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य *कनिष्ठ* महाविद्यालयातील शै.वर्ष.२०२०२१ मधील *नीट परीक्षेत* कु.सृष्टी सुशील सूर्यवंशी ४९०,चि.सचिन जगदीश भारती ४८६,चि.जयसागर नीलकंठ सोनवणे ४२५,चि.अनुष्का रविंद्र पाटील ४२३ यांनी गुण प्राप्त केले आहेत तसेच रिपीटर विद्यार्थी कु.कोमल यशवंत पाटील ५६४,कु.धनश्री दिलीप राठी ५१०,चि. सिद्धेश मनिष जैन ५००,चि. हिमांशू भगवान हळपे ४६८,कु.श्रध्दा विजय भावसार ४४५,चि.करण शंकर
अहिरे ४४४,यांना असे गुण प्राप्त झाले आहेत.
या विद्यार्थ्यांप्रमाणे *एमएचटी-सीईटी परीक्षेत* चि.ऋतुराज प्रविण पाटील,९९.६८चि.प्रथमेश अनिल कोठावदे,९९.५० चि.मयूर किरण पाटील ९७.०८,चि.अनुराग नरेश वाल्हे ९५.७५ ,कु.अश्विनी शरद चौधरी ९५.११ तर रिपीटर विद्यार्थी चि द्रोनेश महेंद्र मगरे ९९.२२ या प्रमाणे गुण प्राप्त झाल्याने उपरोक्त नीट उत्तीर्ण विद्यार्थी मेडिकल प्रवेशासाठी तर, एमएचटी-सीईटी उत्तीर्ण विद्यार्थी इंजिनियरिंग प्रवेशासाठी पात्र ठरल्याने तर,*गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय रेसलिंग चॅमपियनशिप २०२१ मध्ये महाविद्यालयाचा विद्यार्थी कु.अक्षय देविदास सोनवणे सुवर्णपदकाचा मानकरी ठरल्याने* संस्थेचे अध्यक्ष अँड.संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह दि.०९-११-२०२१ रोजी महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात सत्कारानंतर अक्षय सोनवणे या विद्यार्थ्यांसह पालक डॉ.रविंद्र भास्कर पाटील यांनी संस्था तथा महाविद्यालयाचा कार्यगौरव करून कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी अँड.संदीप पाटील यांनी मनोगतातून विद्यार्थी शिक्षक व पालक यांचे अभिनंदन करत गुणवत्तेची परंपरा निरंतर वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नरत राहण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले.
कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी,उपप्राचार्य प्रा.डॉ.व्ही.टी.पाटील,उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे पर्यवेक्षक प्रा.एस.पी.पाटील, यांच्यासह गुणवंत विद्यार्थी पालक डॉ.सुशिल सूर्यवंशी व डॉ.सौ.कविता सूर्यवंशी,श्री.अनिल कोठावदे व सौ.कल्पना कोठावदे श्री.विजय भावसार आदी उपस्थित होते.
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे यांनी मानलेत*