जिल्हा बँक निडणूकीत पक्ष निष्ठचे दावेदार पक्ष आदेश झुंगारत निवडणूक रिंगणात.. भोपळा हाती घेऊन विरोधकांच्या विजयात शहनाई वाजवतांय का ? चारीमुंड्या चीत तरीही चेहऱ्यावर स्मित..!वा भाई वा क्या बात है..!*
चोपडा दि.२४(प्रतिनिधी)दिवाळी नंतर लगेच लागलेल्या जिल्हा बँक निवडणुकीत नामांकित पक्ष कार्यकर्त्यांनी निवडणुक आखाड्यात पाय ठेवला खरा ..मात्र कंबर खोसून जिकण्या करिता नाहीतर फक्त लक्ष्मी बाम्बच्या उडालेल्या कागदी पत्त्या गोळा करून कधी नव्हे इतकी गोड मिठाईचा डब्बा नाही ..तर दहापट मलईदार पेट्यांचा ढीग पदरी पाडण्याचा शानदार डाव खेळण्यात आला. त्यात काहींना कल्पवृक्ष प्रसन्न होऊन मनोकामना पूर्णत्वाचा प्रसाद ही देऊन गेला. सर्व सारिपाटाचा खेळ बघणाऱ्या जनक (जनता)राजा मात्र दुध पिण्या ईतका खुळा राहिलेला नाही.. निवडणूकीच्या जादुई आरशात सर्व काही पाहिलं गेलं की.. निवडणूक आखाड्यात नामांकित पक्षाने जुडवा जुडवीच्या गणितात जादुई छडी फिरल्याने अपयशाच्या माळ माथी पडण्याच्या भीतीने रणांगणातून एकाचवेळी सर्वांना काढता पाय घेतला. तसा पक्षानेही फर्मान काढले मात्र काही पक्षप्रिय पक्षनिष्ठ पदाधिकारी यांनी पक्षाचे आदेश धुडकावत पायदळी तुडवत निवडणूक आखाड्यात एकाकी दंड थोपटले आणि दोन हात करण्याची हिंमत दाखवली व जिंकण्याचा दावाही केला गेला अमके-डमके ठराव आपल्याकडे असल्याचा पोकळ दर्पोक्ती ही केली गेली.निवडणूकीची तारीख जवळ आली आणि या महोदयांना अक्षरक्ष: खुलं जा सीम सीम सारखाच कर्णकुटी दरवाजा उघडला..अन् पाहता पाहता चक्क.. राजलक्ष्मी लाॅटरीच तिकिटच देवा दूतांनी हाती टेकवल्याने स्वर्गात आल्याचा आभास नाहितर प्रत्यक्ष स्वप्नच पूर्णत्वास आल्याने गगन मावेनासे झाले असावे..! मात्र हि कहाणी जन राजाला पचनी पडली नाही.जो जिंकण्यासाठी लढतो तो शूर आणि तो पूर्णपणे ताकदीने लढतो..मात्र भोपळा हाती पाडून खातेही फोडता आले नाही..पक्षाचा आदेश ही पाडता आला नाही .. शिवायआपल्या सोबतींनी नांग्या टाकल्या.. तरीही महाशयांनी आखाड्यात असल्याचा वरवर डाव खेळला..अन् लढलाच नाही तरीही जिंकण्या पेक्षाही अधिका अधिक स्मित चेहऱ्यावर खेचून आणलं..याला कायं म्हणावे असा प्रश्न जन राजा समोर उभा ठाकला आहे.या उपरोक्त या पक्षाचे स्वतः ला पक्षनिष्ठ म्हणणारे विरोधकांच्या आनंदी सोहळ्यात सहभागी होऊन माईकवर गुण गाण्याची परिसिमा गाठतात याला काय म्हणावे..! राजकारणात सर्वच चालतें का? तळागाळातील पक्ष कार्यकर्त्यांनी अशीच निष्ठा जोपासावी का?असे एक ना अनेक प्रश्न जन सामान्यांच्या मनात यानिमित्ताने घर करुन गेले आहेत. राजकारणातील नेते ,पदाधिकारी , कार्यकर्ते हे सर्वच जन सेवेसाठी पुढे येतात की विना कष्ट माया जमविण्यासाठी? हेच कोडे सुज्ञ नागरिकांना पडले आहे.एव्हढे मात्र खरे..!