चौगाव येथे संविधान दिवस साजरा
चौगांव,ता.चोपडा (प्रतिनीधी विश्राम तेले) : चौगांव ता.चोपडा येथे ग्राम पंचायत कार्यालयात दि.२६/११/२०२१सकाळी दहा वाजता सरपंच सौ.सुनंदाबाई केशव कोळी यांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आला
.यावेळी २६/११/२००८ला झालेल्या मुंबई शहरावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तद्नंतर पंतप्रधान आवास योजनेतील "ड"यादीतील पात्र व अपात्र लाभार्थ्यांच्या नावांचे वाचन करण्यात आले.पात्र पण वंचित राहीलेल्या लाभार्थ्यांना नव्याने दोन दिवसात अर्ज करण्याचे अवाहन ग्रामसेवक दिनेश पाटिल यांनी केले.या कार्यक्रमाला सुप्रिया पाटिल अंणवाडी पर्यवेक्षिका ,सरपंच सौ.सुनंदाबाई केशव कोळी,उपसरपंच गं.भा.कमलबाई राजाराम राजपूत सदस्य बापुराव पुंडलीक धनगर,सुरेश नामदेव धनगर,गोपाल देविदास पाटिल, पिरण ओंकार भिल, योगिता मनोहर पाटिल,कल्पना गोकूळ पारधी,सुलोचना शामकांत पाटिल ,ग्रामसेवक दिनेश पाटिल पो.पा.गोरक हरचंद राजपूत ,विविध संस्थांचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार बंधू व ग्रामस्थ उपस्थीत होते.