नवीन पोलीस स्टेशन समोरील शहादा लोणखेडा बायपास चौफुली चे नामकरण करुन संविधान चौफुली फलकाचे अनावरण
म्हसावद ,ता.शहादा दि.२८:(प्रतिनिधी): -
संविधान गौरव दिनानिमित्त शहरातील नवीन पोलीस स्टेशन समोरील शहादा लोणखेडा बायपास चौफुली चे नामकरण करुन संविधान चौफुली फलकाचे अनावरण ज्येष्ठ दलित नेते बापूजी जगदेव व जि प सदस्य मोहन शेवाळे यांच्या हस्ते फित कापून फलकाचे अनावरण करण्यात आले.
याप्रंसगि प्रमुख म्हणून काॅ सुनील गायकवाड ,पालिकेचे माजी पाणी पुरवठा सभापति दादा जगदेव , युवा नेते मुनेशचंद्र जगदेव ,विजय पाटील , मनोज बिरारी ,नरेंद्र महिरे, नरेंद्र कुवर, बापू घोडराज, मिलिंद शिरसाठ, शांतीलाल अहिरे, ,मगन शिरसाठ, पितांबर बॆसाणे,राजेंद्र आगळे ,प्रवीण खाडे ,रमेश बर्डे ,सचिन जाधव ,शेखर गवळे , सुशील बैसाणे ,निलेश महिरे ,मिलिंद बागले ,शैलेश कुवर , राजेंद्र बि-हाडे, प्रशिक अहिरे आदी उपस्थित होते शहरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ संविधान चौक नामकरण करण्यात आल्याने शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यावेळी संविधान पुस्तके चे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून प्रास्ताविकेचे वाचन नरेंद्र महिरे यांच्या हस्ते करण्यात आले .