धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीतर्फे विश्व वंदनीय*डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन

 



धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीतर्फे  विश्व वंदनीय*डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन

धुळे दि.२६ (प्रतिनिधी)

*भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य, न्याय, हक्क, समानता देणारे सर्वोच्च संविधान आहे*.देशातील तरुण, तरुणीं मध्ये संविधानाची मूल्ये रुजविणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे*.

*आज संविधान दीन साजरा करतांना आपली लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा निर्धार करीत आज दिनांक* *२६/११/२०२१ रोजी धुळे येथील शहर पोलीस चौकी जवळील महामानव विश्व वंदनीय*डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या महिला आघाडीच्या पदाधिकारी व* *कार्यकर्ते यांनी संविधान उद्दीष्ट वाचन करीत संविधान दिन साजरा केला*.

*यावेळी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा सौ शोभाताई आखाडे, सौ सुरेखा ताई नांद्रे, सौ गायत्री ताई पाटील, सौ प्रवीना ताई भावे, सौ छाया ताई सोमवंशी, सौ सुषमा ताई महाले आदी व कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या धुळे जिल्हा सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा सौ शोभा ताई आखाडे यांनी दिली व श्री अविनाश राजाराम लोकरे प्रसिद्धीप्रमुख तथा सोशलमिडिया प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धुळे शहर कार्यकारणी यांनी प्रसिद्ध केली*.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने