मोर्य क्रांती संघ जनजागृती संपर्क यात्रेचे जंगी स्वागत होणार जळगाव जिल्ह्याच्या प्रवेशद्वारी..


 


मोर्य क्रांती संघ जनजागृती संपर्क यात्रेचे जंगी स्वागत होणार जळगाव जिल्ह्याच्या प्रवेशद्वारी..

   . जळगाव दि .३(प्रतिनिधी): समाज हा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यात वास्तव्यास आहे.महाराष्ट्राच्या जडणघडणीत धनगर समाजाचा सिंहांचा वाटा आहे.या देशाचा कधीकाळी मालक असलेला हा समाज आज अत्यंत दयनीय अवस्थेत व अनेक समस्यांशी संघर्ष करताना दिसत आहे. या देशाच्या व्यवस्थेला उखडुन टाकण्यासाठी "मौर्य क्रांती संघाच्या"रुपात धनगर समाजाला जागृत करण्यासाठी संपर्क यात्रा घेऊन गावोगावी प्रचार व प्रसार करीत आहे.* 

*जळगाव जिल्ह्यात "मौर्य क्रांती संघाची"संपर्क यात्रा ७ नोव्हेंबर २०२१ रोजी येत आहे.*वाकोद हे गाव म्हणजे जळगाव जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे.*या गावाचे माजी सरपंच मा.सुरेशदादा जोशी(गोंधळी समाजाचे नेते) व वाकोद गावाचे  विद्यमान प्रथम नागरिक मा.संजयभाऊ सपकाळे या द्वयींची भेट राजेंद्र खरे (जिल्हा संयोजक बहुजन क्रांती मोर्चा) व सुमित्र अहिरे (खान्देश प्रभारी)यांनी घेतली व चर्चा केली.*या गावात या संपर्क यात्रेचे जोरदार स्वागत करण्याचे व वाकोद ते पहुर पर्यंत मोटार सायकल रॅली काढण्यात येईल असे घोषित केले.*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने