शहिदो कें नाम" कार्यक्रमात..शेकडो दिव्यांनी लखलखली चोपडानगरी .. 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना भावपूर्ण आदरांजली.. गटनेते जीवनभाऊ चौधरी यांच्या प्रशंसनीय उपक्रमात सर्व पक्षीय नेत्यांसह हजारोंची हजेरी*

 

" *एक दिवा शहिदो कें नाम" कार्यक्रमात..शेकडो दिव्यांनी लखलखली चोपडानगरी .. 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना भावपूर्ण आदरांजली.. गटनेते जीवनभाऊ चौधरी यांच्या प्रशंसनीय उपक्रमात सर्व पक्षीय नेत्यांसह हजारोंची हजेरी*


चोपड़ा दि.२७(प्रतिनिधी): देशाच्या सीमेपासून ते आंतरिक सुरक्षेसाठी स्वतःच्या जिवाची आहुती देणाऱ्या शहीद वीर जवानांच्या शौयांस नमन व २६ /११ च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दि.२६ रोजी शहरातील कारगिल चौकात संध्याकाळी ६ वाजता शेकडो दिव लावून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी तालुक्यातील नागलवाडी येथील शहीद वीर जवान नाना सैदाणे यांना त्यांच्या पत्नी नीताताई मैदाणे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला संविधान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून शपथ देण्यात आली. त्यानंतर चोपडा नगरपालिकेच्या वसुंधरा अभियानासाठी एक झाड वसुंधरेसाठी ही शपथ देण्यात आली. चोपडा पालिकेच्या माध्यमातून नियोजित असलेल्या कारगिल चौकाच्या संकल्प चित्राचे अनावरण  करण्यात आले. . पालिका गटनेते जावन चौधरी यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमास तालुक्यातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.  यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी आ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे, माजी जिल्हाध्यक्ष अँड संदीप पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, जिप माजी अध्यक्ष गोरख पाटील, जगन्नाथ पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रावले, शहर पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, गटविकास अधिकारी बी एस कोसोदे, बाजार समिती सभापती दिनकर देशमुख, उद्योजक सुनील जैन, शेतकी संघ चेअरमन दुर्गादास पाटील, प स सभापती कल्पना पाटील, पालिकेचे गटनेते जीवन चौधरी, नगरसेवक हितेंद्र देशमुख, रमेश शिंदे, कैलास सोनवणे, अशोक बाविस्कर, गटनेते महेंद्र धनगर, नगरसेविका संध्या महाजन, दीपाली चौधरी, अश्विनी गुजराथी, गिरीश पाटील, कृती समितीचे एस बी पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष श्याम परदेशी, नंदकिशोर पाटील सह शेकडो नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राधेश्याम पाटील यांनी केले तर पंकज पाटील व प्रीती सरवैय्या यांनी देशभक्तीपर गीत गायले. यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने