मनवेल येथे स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनिवाले दादाजीच्या श्राध्द सोहळा साजरा
मनवेल ता.यावल दि.०१ ( प्रतिनिधी गोकुळ कोळी )
मनवेल येथे हजारो भावीकांच्या उपस्थितीत श्री रेवानंद स्वामी गुरु केशवानंद धुनीवाले दादांजी यांच्या श्रांध्द सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला. गुरूवारी सकाळ पासुनच गावातील धुनीवाले दादांजी दरबारात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. व या श्राध्द सोहळ्या निमित्त राज्या सह शेजारील राज्यातुन हजारोंच्या सख्येत भाविकांनी उपस्थिती दिली होती व कोरोना नियमांचे पालन करीत येथसे स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादांजी यांचा श्रांध्द सोहळा संपन्न झाला या निमित्त गावाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.
मनवेल ता. यावल येथे दरवर्षी अविधवा नवमीला स्वामी रेवानंद गुरुकेशवानंद धुनीवाले दादांजी यांचा श्रांध्द सोहळा साजरा केला जातो यंदा हा सोहळा गुरूवारी दि. ३० सप्टेबंर गुरूवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त सकाळी ७ वाजता आरती, ८ वाजता सेवा, १० वाजता होम, हवन सेवा व दुपारी १२ वाजेपासून महाप्रसाद वितरण करण्यात आले तर साय.४ वाजेला गावातपालखी मिरवणूक काढण्यात आली यात मोठया संख्येत भक्त भाविका सहभागी झाले होते व गावातील प्रमुख मार्गावर रांगोळ्या व विविध प्रकारे खेळणी दुकाने व पुजेचे साहित्याचे स्टॉल लावण्यात आले होते तर रात्री ८ वाजेला महाआरती व १० वाजेपासून रात्रभर भजन गायनचा कार्यक्रमा सुरू होता. कार्यक्रमास मनवेन सह दगडी, साकळी, थोरगव्हाण, पिळोदा, पथराडे, शिरागड, शिरसाड येथील भावीकांचे सहकार्य लाभले. या सोहळ्यां निम्मत साकळी ते मनवेल मोफत प्रवाशी वाहतुक सुविधा पुरवण्यात आली होती. साकळी येथे बापु धोबी यांचा कडुन शिरा, पोहे वाटप करण्यात आले तसेच मनवेल येथील महर्षि वाल्मीक मित्र मंडळा कडुन मोफत भक्त भाविकांना चहाचे वितरण करण्यात आले गावातील बस स्थानका जवळील महर्षी वाल्मिक चौकात चहा वितरण केली गेली. तस गावात वरण पोळी व गंगाफळ भाजी असा महाप्रसाद होता.
लोकप्रतिनिधी सह अधिकारी वर्गाच्या भेटी.
मनवेल येथे या श्राध्द सोहळ्यास आरोग्य व शिक्षण सभापती रविंद्र सुर्यभान पाटील, चोपडा माजी आमदार कैलास पाटील, जगन्नाथ बाविस्कर, माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील, उमेश फेगडे, वढोदा सरपंच संदिप सोनवणे, जिल्हा बँकेचे संचालक गणेश नेहेते, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत महाजन, सौ विद्यताई महाजन, भरत चौधरी, शिरागड सरपंच प्रताप सोनवणे तसेच जिल्हा परिषद व ग्राम विकास विभागातील अधिकारी वर्गाने देखील श्राध्द सोहळ्यास भेट देत दर्शन घेतले.