माध्यमिक विद्यालय आमलाड येथे राष्ट्रीय पोषण मासानिमित्त सकस आहाराविषयी मार्गदर्शन
म्हसावद ता,शहादा दि.,०१(प्रतिनिधी):-
तळोदा तालुक्यातील विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्था तळोदा संचलित माध्यमिक विद्यालय आमलाड येथे राष्ट्रीय पोषण माह निमित्त सकस आहार याविषयी माहिती देण्यात आली.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. व्ही. मराठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विविध प्रकारचे कडधान्य, पालेभाज्या, फळे, दुग्धजन्य पदार्थ, रानभाज्या, कंदमुळे, यांतून आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले प्रथिने, जीवनसत्वे, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके इ. पोषक घटक यांच्या विषयी माहिती दिली. सकस आहार खाल्याने प्रकृती निरोगी व तंदुरुस्त राहते व पोषक घटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या व्याधी पासून आपला बचाव होतो.
याप्रसंगी शिक्षक आर बी कुवर, ए ए शेंडे, एस ए सुर्यवंशी, बी बी भामरे, डी एन गिरासे, आर के पाडवी, वाय एस मासुळे, श्रीमती ए एस जाधव, लिपिक पी टी चव्हाण व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.