नवोदय प्रवेश परीक्षेत क्वॉलिटी नॉलेज सर्कल स्पर्धेत कु. मनस्वी गायकवाड़ हीने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
म्हसावद दि.०१:(प्रतिनिधी):-
नुकत्याच झालेल्या नवोदय प्रवेश परीक्षेत क्वॉलिटी नॉलेज सर्कल स्पर्धा परीक्षा केंद्राची विद्यार्थिनी कु. मनस्वी गायकवाड़ हीने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिऴवला . या प्रसंगी तीचा सुवर्ण पदक व प्रशस्ती पत्र देउन् सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जैन कंप्यूटर चे संचालक श्री मयूर चोरड़िया, युवा उद्योजक श्री राजेंद्र ललवाणी, क्वॉलिटी क्लासेस चे संचालक श्री मनोज बाफना उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सागर निकुंभ याने केले व आभार प्रदर्शन यज्ञ पाटील याने केले. कार्यक्रमाचे नियोजन नीलेश बाफना व विद्यार्थ्यांनी केले.