शहादा तालुक्यातील बहिरपूर व परिसरात लम्पि आजार प्रतिबंध लसीकरण
म्हसावद दि.०२:(प्रतिनिधी):-
शहादा तालुक्यातील बहिरपूर व परिसरात पशु संवर्धन विभाग मार्फत पाळीव जनावरांचे लसीकरण करण्यात येत असून संसर्ग जन्य लम्पि आजार नियंत्रित करण्याचा प्रयत्न केले जात आहे
ग्रामीण भागातील गरीब नागरिक शेतकरी बांधव यांचे धन समजले जात असलेल्या जनावरे यांच्यावर लम्पि या त्वचा आजारापासून बचाव व्हावा यासाठी पशु संवर्धन विभागाच्या वतीने शहादा तालुक्यात लसीकरण राबविण्यात येत आहे. लम्पि त्वचा रोग विषानु जन्य असून एका जनावराकडून दुसऱ्या जनावराला होतोयामुळे व यात जनावरी दगावली यामुळ शेतकरी व गरीब नागरिकांचे मोठे नुकसान होते या आजारामुळे जनावरा चा बचाव व्हावा यासाठी खेडदिगर परिसरात
पशु संवर्धन विभागाच्या वतीने पाळीव जनावराचे लसीकरण करण्यात ते आहे आत्तापर्यंत खरगोन ३००,श्रीखेड २००,खेड दिगर १०० बिलाडी त.ह.१५० असे एकूण ७५० गाय व म्हैस याचे लसीकरण झाले आहे.लम्पि रोग विषयी पशु पालकाना मार्गदर्शन करण्यात येत आहे यावेळी डॉ.विजय सामुद्रे,डॉ.वसंत बिरारे,डॉ.हिंमत पावरा,भटू धोबी,रोहित मालाचे यांनी परिसरत लसीकरण केले यावेळी दुर्गेश पाटील,मनीष पाटील,शांतीलाल पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो:खेडदिगर येथे जनावरांना लसीकरण करताना डॉ.विजय सामुद्रे भटू धोबी व ग्रामस्थ.