जनसेवेसाठी झपाटलेल्या तरूणाऔच्या "सेवा परो धर्म"कार्याची पालकमंत्र्यांनी घेतली दखल.. राहूल पाटील यांचा कोरोना योध्दा म्हणून यथोचित गौरव.. पंकज नगरवासियांची छाती फुलली अभिमानाने..!*
चोपडा ,दि.३१(प्रतिनिधी): शहरातील तरुण तडफदार व पंकज नगरातील रहिवाशांचे आशास्थान असलेले सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांनी कोरोना काळात केलेली अनोखी जनसेवा स्मरणीय ठेऊन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधत कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री ना. भाऊसो.गुलाबरावजी पाटील यांच्या वरदहस्ते कोरोना योध्दा म्हणून यथोचित गौरव करण्यात आला आहे.त्यांच्या या गौरवाने त्यांच्यावर पंकजनगर परिसरात जोरदार अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला आहे.
पंकज नगर व परिसरातील काॅलनी भागांमध्ये राहुल पाटील यांची "सेवा परो धर्म" या उक्तीप्रमाणे कोणाचें मतदान कार्ड घरी पोहचविण्यापर्यंत असो वा आजारी रुग्णांस दवाखान्यात दाखल करण्यापर्यंत असो सर्वंच जन सेवेची कामे तन-मन-धनाने पूर्ण करतात .अशीच सेवा कोरोनाच्या महामारी सारख्या कठीण काळात प्रत्येक नागरिकांना इन्फेक्शन पासून तर ऍडमिट करे पर्यंत आणि अजून भरपूर काही मदत केली. स्वतःच्या घरातील14 चे14 मेंबर पोझिटीव्ह असतांना सुद्धा मदत मनांवर दगड ठेवत जनहितासाठी स्वतः ला झोकून घेत जनसेवेत तल्लीन होऊन सेवा सुरु ठेवली.कोरोना काळात10 कोरोना टेस्टिंग कॅम्प लावले व लसीकरणाला नागरिकांना मदत केली.त्याच्या अविरत सेवा पाहुन पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते कोरोना योध्दा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मेहनती व जनसेवेसाठी झपाटलेल्या युवकांच्या गौरवाने पंकज नगरवासियांची छाती मोठ्या अभिमानाने फुलली असल्याचे मत नगरवासियांनी व्यक्त केले आहे.*