*आदिवासींच्या न्यायासाठी वरगव्हाण सरपंच भूषण पाटील यांचा पुढाकार*..पेसा अंतर्गत योजनेचे विशेष मार्गदर्शन.. आदिवासी सेवक संजीव शिरसाठ यांची उपस्थिती...
वरगव्हाण,ता.चोपडा दि.३१(प्रतिनिधी): दि.२९.ऑक्टोबर२०२१ रोजी वरगव्हाण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या इच्छापूर (शेवरे बु.) येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेचे वैशिष्ट्य म्हणजे आदिवासींच्या विकासासाठी व त्यांचे न्यायिक हक्कांचे व अधिकारांचे विस्तृतपणे चर्चा करणे व त्यावर अंमलबजावणी करणे होय. त्यात प्रामुख्याने, वनहक्क कायदा अंतर्गत आदिवासींच्या वन जमिनिंचे प्रश्न शासन दरबारी मांडणे., तसेच सदर वस्त्यांना गावठाण चे प्रस्ताव सादर करणे. त्या गावांना शासनाच्या निकषानुसार महसुली गावांचा दर्जा प्राप्त करून देणे. तसेच महत्वाचे म्हणजे चोपडा तालुका हा अंशतः अनुसूचित क्षेत्र (PESA- Panchayat Extension Of Scheduled Area, अर्थात अनुसूचित क्षेत्र विस्तार कायदा) म्हणुन ओळखला जातो. त्यासाठी या आदिवासी गावांना पेसा कायदा अंतर्गत सर्वस्थरिय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.
या ग्रामसभेला वरगव्हाण ग्रामपंचायतचे सरपंच- प्रविण गोरख पाटील (उर्फ भूषण भाऊ) विषेश उपस्थित होते. ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणुन उपसरपंच-निमाबाई प्रताप बारेला, यांची निवड करण्यात आली. या सभेला तालुकास्तरीय अधिकारी व इतर कर्मचारी यांना आमंत्रित केले होते. त्यात तालुका पेसा समन्वयक- प्रदिप आर.बाविस्कर, तलाठी श्री.सरवर तडवी, वनपाल- आर.यु. घोडे, वनहक्क समिती अध्यक्ष-प्रताप बारेला, वरगव्हाण ग्रा प सदस्य रवींद्र पाटील, जहांगीर तडवी, जावेद तडवी, ग्रा प सादस्यां सौ.इंद्रायणी पाटील, सायराबाई बारेला, यास्मिन तडवी, ,सपना बारेला, आदी. गामसभेचे सचिव ग्रामसेवक श्री.राजेश विजय सोनार यांनी सभेचे प्रास्ताविक मांडून सभेचे विषय ग्रामस्थांसमोर सादर करण्यात आले. ग्रामसभेला विषेश आदिवासी बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष, तथा लोक संघर्ष समिती जिल्हा सचिव भाऊसो संजिव शिरसाठ हे उपस्थित होते. पोलीस पाटील- श्री.गणदास सुरभान बारेला, इच्छापूर(शेवरे बु), पोलीस पाटील-गेलसिंग बारेला (शेवरेपाडा), जगदीश बारेला, सुभाराम बारेला,कमलेश बारेला, रायसिंग बारेला, बालसिंग बारेला, गुडडी दशरथ बारेला, समाधान बारेला, दयाराम बारेला, बामट्या बारेला (ऋषीपाडा) येथील शेकडो ग्रामस्थ सभेला उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
पेसा कायदा व वनहक्क कायदा बाबत सविस्तर मार्गदर्शन, तालुका पेसा समन्वयक श्री.प्रदिप बाविस्कर यांनी केले. यात पेसा नियम व त्या नियमांमुळे ग्रामसभेला प्राप्त अधिकार बाबत माहिती देण्यात आली. उपजीविकेसाठी जंगलातील गौण संसाधने, गौण वनोपज व्यवस्थापन त्यांचे संगोपन, जतन व विल्हेवाट बाबत नियोजन करून त्यांचा वापराबाबत सांगितले. सभेत विविध विषय सर्वानुमते संमत करण्यात आलेत. त्या प्रामुख्याने १) गावाला महसूली दर्जा मिळणे. २) वनहक्क कायदा अंतर्गत गावठाण, स्मशानभूमी साठी जागा, निस्तार सारखे हक्क, गायरान साठी जागा मागणी चे प्रस्ताव तयार करून शासनास सादर करणे. ३) पेसा योजचा निधी मागणीचा प्रस्ताव सादर करणे. ४) गौण वनोपज संकलन केंद्र उभारुन त्यासाठी प्राधिकृत व्यक्तीची निवड करून, गौण वनोपज वाहतूक परवाना मागणी करणे. असे अनेक विषय सभेत मंजुर करण्यात आले. या ग्रामसभेला सरपंच यांनी पुढाकार घेतला व संजिव भाऊ शिरसाठ यांनी पण ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. श्री गणदास बारेला यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ यांचे आभार मानले.