दिव्यांग सेना आणि दिव्यांग विकास महासंघाचेवतीने धरणगाव तहसीलदारांचा सत्कार.. दिव्यांना मिळणारं बीपीएल पिवळे रेशनकार्ड ...





 दिव्यांग सेना आणि दिव्यांग विकास महासंघाचेवतीने धरणगाव तहसीलदारांचा सत्कार.. दिव्यांना मिळणारं बीपीएल पिवळे रेशनकार्ड ...

 धरणगाव दि.२९(प्रतिनिधी):  दिव्यांग सेना आणि दिव्यांग विकास महासंघ यांच्या माध्यमातून धरणगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब श्री नितीन कुमार देवरे यांचा सत्कार दिव्यांग विकास महासंघाचे अध्यक्ष श्री पी एम पाटील सर, दिव्यांग सेना जिल्हा अध्यक्ष श्री अक्षय महाजन सर, तालुका अध्यक्ष संजय पाटील,यांच्या माध्यमातून करण्यात आला. त्यावेळेस साहेबांनी मोलाचे मार्गदर्शन करून सर्व गोरगरीब तालुक्यातील दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजना मध्ये 35 किलो धान्य योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामध्ये दिव्यांग बांधवांना बीपीएल पिवळे कार्ड देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. त्यावेळेस वासुदेव वाघ धरणगाव शहराध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा पाटील, महिला उपजिल्हाध्यक्ष सरला सोनवणे, देवा महाजन, सुदाम चव्हाण, सपना चौधरी,शहर प्रमुख नंदलाल कुलथे, राजू चौधरी उपशहर प्रमुख, राजेंद्र फुलपगारे, ज्योती पाटील तसेच पदाधिकारी उपस्थित होते. अंत्योदय योजनेचा लाभ मिळणार असल्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने