*काँग्रेसतर्फे सरदार पटेल व स्व* *इंदिराजींना अभिवादन*
*चोपडा*दि.३१(प्रतिनिधी)- 31ऑक्टोबर 2021 रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाईजी पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने व स्वर्गीय इंदिराजी गांधी माजी पंतप्रधान यांच्या स्मृतिदिनानिमित्त चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे अभिवादन करण्यात आले. चोपडा शहर काँग्रेस अध्यक्ष के डी चौधरी, उपाध्यक्ष एडवोकेट एस डी पाटील यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी व स्वर्गीय वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण करून पुष्पांजली अर्पण केली. यावेळी के डी चौधरी, प्राध्यापक संदीप पाटील यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी राजेंद्र भास्करराव पाटील, शशिकांत साळुंके, रमाकांत सोनवणे, किरण सोनवणे, इलियास पटेल, देवकांत चौधरी प्राध्यापक पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल ,इंदिरा गांधी अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या.