बीजेपीच्या जिल्हा ओबीसी सेलच्या उपाध्यक्षपदी*प्रवीण चौधरी सत्कार संपन्न

 



बीजेपीच्या जिल्हा ओबीसी सेलच्या उपाध्यक्षपदी*प्रवीण चौधरी सत्कार संपन्न*

*चोपडादि.३१(प्रतिनिधी)*- श्री प्रवीण ईश्वर चौधरी यांची बीजेपीच्या जिल्हा ओबीसी सेलच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचा चोपडा तेली समाजातर्फे 26 ऑक्टोबर 2021 रोजी संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे संपन्न झाला. श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा यांचे संयुक्त विद्यमाने प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष  के. डी. चौधरी  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवीण चौधरी यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .यावेळी प्रदेश तेली महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रशांत सुभाष चौधरी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नारायण चौधरी, प्रकाश चौधरी, ह-भ-प गोपीचंद महाराज, देवकांत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने