गरिबांच्या दिवाळीसाठी मदतीचा हात द्या..भाऊसो गुलाबरावजी पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल, माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजचा स्तूत्य उपक्रम

 




*गरिबांच्या दिवाळीसाठी मदतीचा हात द्या..भाऊसो गुलाबरावजी पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल, माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजचा स्तूत्य उपक्रम

धरणगाव (प्रतिनिधी )दि.,२७:भाऊसो गुलाबरावजी पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल, माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजने दिवाळीत फराळ, कपडे आणि शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे. दात्यांकडून फराळ, सुस्थितीतील जुने कपडे, नवीन कपडे आणि शालेय साहित्य गोळा करून, प्रत्येक वाडा-वस्तीवर शाळेचे शिक्षक जाऊन त्याठिकाणी वाटप करणार आहेत असा हा उपक्रम आहे. ज्यांना शक्य नसेल पण देण्याचे सुख अनुभवायचे असेल तर त्यांनी जुने कपडे स्वच्छ धुवून व इस्त्री करून द्यावे, फराळ द्यायचा असेल तर भाऊसो गुलाबरावजी पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल पाळधी येथे संपर्क करावा असे आव्हान जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने