धानोऱ्यात डेंग्यूचे रुग्ण ग्रामपंचायत सह प्राथमिक आरोग्य केंद्राचे दुर्लक्ष
अडावद ता.चोपडादि.२७,(डॉ. सतिश भदाणे):
धानोऱ्यात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने मलेरिया, टायफाइडसह डेंग्यू आजाराचे थैमान घातले आहे. खासगी रुग्णालये हाउसफुल असून डेंग्यूच्या रूग्णांवर जळगांव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गावात डेंग्यूची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असूनही ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राकडून आजपर्यंत काहीएक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आजपर्यंत गावात दहा ते बारा रूग्णांवर डेंग्यू सदृश्य आजार असल्याने जळगांव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे तपासणी नाही
धानोऱ्यात डेंग्यूचे रुग्ण सापडत असूनही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी तपासणी साठी गावात येण्याची तसदी घेतली नाही.
गावात हिवताप तपासणी मोहीम राबवून डासांचे नियत्रंण करण्यासाठी फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ग्रामपंचायती कडून स्वच्छता नाही
गावात डेंग्यू सदृश्य आजाराने डोके वर काढले असूनही ग्रामपंचायत प्रशासनातर्फे आजपर्यंत काहीच उपाययोजना करण्यात आली नाही.
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून
डेंग्यू आजार जोर पकडत आहे. तरीही गावात ग्रामपंचायत कडून स्वच्छता मोहीम अथवा मच्छर प्रतिबंधात्मक फवारणी केली नाही.
गावात डेंग्यू सदृश आजाराचे रुग्ण असल्याचे समजले त्यामुळे गावात डेंग्यू अळी तपासणी मोहीम राबविण्यात आली व नागरीकांना कोरडा दिवस पाळण्याबाबत सूचना दिल्या. डेंग्यू असल्याने रूग्णांवर जळगांव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असले तरी आजपर्यंत कोणीही आमच्यापर्यंत डेंग्यू झाले असल्याची माहिती कळवली नाही.
-
डॉ उमेश कवडीवाले, वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र धानोरा.