कोवीड १९ चे नियमानुसार निवासिनी श्री सप्तश्रुगी देवीचे प्रवेशद्वार भावीकांसाठी होणार खुले

 


कोवीड १९ चे नियमानुसार  निवासिनी श्री सप्तश्रुगी देवीचे  प्रवेशद्वार भावीकांसाठी होणार खुले


   ✍️ गोकुळ कोळी

मनवेल ता.यावल : तापी व मानकी नदीच्या संगमावर असलेल्या शिरागड येथील निवासिनी श्री सप्तश्रुगी देवीच्या मंदिराचे प्रवेशद्वार कोवीड १९ चे नियम पाळुन भावीकांसाठी खुले होणार असुन आ.सौ,लताताई सोनवणे यांच्या हस्ते घट पुजन करण्यात येणार असल्याची माहीती संस्थानचे अध्यक्ष शांताराम सदु सोळंके यांनी दिली.

श्री सप्तश्रुगी देवीच्या गडापर्यत येणाऱ्या - जाणाऱ्या भावीकांसाठी रस्ता तयार करण्यात आला असुन विविध सुविधा पुरविण्यात येणार आहे.

निवासिनी श्री सप्तश्रुगी देवीचे लहान गड म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

तापी व मानकी नदीच्या संगमा जवळ निवासिनी श्री सप्तश्रुगी देवीचे मंदिर आहे.तापी नदीला पुर असल्यामुळे तुरखेडा धामणगाव मार्ग रस्ता बंद आहे तर कोळन्हावी येथून गडावर जाण्यासाठी होळी आहे व साकळी  मनवेल मार्ग दर्शनासाठी  भावीकांना जाता येणार आहे.

 निवासिनी श्री सप्तश्रुगी देवीच्या घटस्थापना व नवरात्र उत्सव निम्मत संस्था मार्फत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वहीगायन, भारुडे,  भजन गायान व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

निवासिनी श्री सप्तश्रुगी देवीच्या मंदिर लहानगड म्हणून प्रसिद्ध आहे भावीकांची मनोकामना पुर्ण होऊन सुख समृद्धी देणारे दैवत आहे शिरागड येथे दाट अरण्य होते तापी नदीच्या काठावर शांत मनमोहक वातावरण उंच टेकड्या व  दऱ्याखोऱ्यात असल्यामुळे येथे रुषिमुनीचे वास्तव होते जगाच्या कल्याणासाठी होम हावन जप तप रुषिमुनी करीत होते याची वार्ता राक्षस दैत्यसुराला कळाली होती त्यावेळी आहाकार माजला होता यावेळी रुषिमुनीनी आराधना केली त्यावेळी निवासिनी श्री सप्तश्रुगी माता प्रगट झाली व दैत्य राक्षस सुराशी युद्ध करुन त्या राक्षसचा  वध केला अशी आख्यायिका आहे.

जिल्हाधिकारी जळगाव यांनी दिलेल्या शासनाच्या  आदेशानुसार भावीकांनी कोवीड १९ चे पालन करुन निवासिनी श्री  सप्तश्रुगी मातेचे दर्शन घ्यावे असे संस्थानचे अध्यक्ष शांताराम सोळंके ,सचिव तथा पो.पा.  सुधाकर सोळंके, सरपंच योगीताताई सोनवणे, आण्णा सोळंके, हिम्मत सोळंके, योगेश सोळंके,   शिरागड येथील ग्रामपंचायत सदस्यं प्रतापदादा सोनवणे, उपरसरपंच भारतीताई सोळंके, सामाजिक कार्यकर्ता रामकृष्ण सोळंके सह शिरागड ग्रामस्थ यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने