विचखेडा-घाडवेल नाल्यावरील वाहुन गेलेल्या फरशीच्या कामास लोकसहभागातून प्रारंभ.. विद्यार्थ्यांची व लोकांची २ कि.मी.ची पायपीट थांबणार.. दातृत्वशाली मनांचे मानावें तेव्हढे धन्यवाद कमीच..!*




 *विचखेडा-घाडवेल  नाल्यावरील वाहुन गेलेल्या फरशीच्या कामास लोकसहभागातून प्रारंभ.. विद्यार्थ्यांची व लोकांची २ कि.मी.ची पायपीट थांबणार.. दातृत्वशाली मनांचे मानावें तेव्हढे धन्यवाद कमीच..!* 


विचखेडा,ता.चोपडा, दि .२९(प्रतिनिधी )घाडवेल-विचखेडा दरम्यान असलेल्या  नाल्यावरील वाहुन गेलेल्या फरशीमुळे उद्भवलेल्या भयावह समस्येमुळे विद्यार्थ्यांचे व गावकऱ्यांची गैरसोय लक्षात घेता सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन  पै-पै गोळा करून अडसर असलेल्या झाडांच्या फांद्या छाटून मुरूम टाकून खड्ड्यांची भराई करून जनसेवेचे मौलिक काम केल्याने नागरिकांनी सामाजिक दानशूर कार्यकर्त्यांनचे मनोभावे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे.अत्यंतहलाखीच्या झालेल्या रस्त्याचे नशिब उघडून रहदारी योग्य बनविल्याने" गावं करेल तिथं राव काय करेल" हे दाखवून दिल्याने विशाल विचार असलेल्या महोदयांच्या उत्कृष्ट कार्याची वाह..वा करावी तितकी कमीच आहे.अशी जोरदार चर्चा होत आहे.


विचखेडा ते घाडवेल दरम्यान नाल्या वरील फरची पूल तुटल्या मुळे एस टी बस बंद झाल्यामुळे चहार्डी चोपडा येथे जाणारे विद्यार्थी वृध्द प्रवासी आजारी पेसेन्ट यांना दोन किलो मिटर पाई जावे लागते तसेच मोटर सायकल वाहन धारकांना कसरत करुन नाला पास करावा लागतो या मार्गाने अनवर्दे बुधगाव मार्गे अमळनेर जवळ असल्याने वाहनांची वर्दळ सुरू असते घाडवेल विचखेडा  नाल्यावरील फरशी पुलाची दुरुस्ती करून व  अनवर्द खु ते घाडवेल दरम्यान असलेली काटेरी झुडपे तोडण्यात यावी याकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी लक्ष द्यावे हि विचखेडा व परीसरातुन मागणी करण्यात आली होती. ही गंभीर बाब तात्काळ लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्रदाद गंगाधर पाटील  यांनी दहा हजार रुपये दिले व चहार्डीचे पत्रकार चंद्रकांत लोटू पाटील यांनी दहा ट्रिपा मुरूम दिला तसेच काही मदतगार पूढे आल्याने या रस्त्याच्या कामास

राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील ,जगदीश पाटील चेअरमन दूध डेअरी चहार्डी ,राजु पाटील मा चेअरमन वि का सोसायटी घाडवेल, एकनाथ पाटील मा सरपंच यांच्या हस्ते नारळ वाढवून  सुरुवात करण्यात आली . यावेळी सुभाष कुंभार अध्यक्ष तंटा मुक्ती, मा उपसरपंच सुभाष संतोष पाटील, अरुण पाटील उपसरपंच, चंद्रकांत पाटील चेअरमन सृष्टी पाणी वापर संस्था, डॉ गिरीश पाटील घाडवेल, अनिल धनगर , धनराज बोरसे, भरत बोरसे, आदीं मान्यवर उपस्थित होते.

 .... *चौकट* ....

हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतो मात्र जि प चे अधिकारी सांगतात की, हा रस्ता बुडीत मध्ये येतो .पण धरणाची उंची कमी झाल्यामुळे हा रस्ता बुडीत मध्ये येत नाही हा रस्ता अंजतीसिम ,विटनेर, मालखेडा, अनवर्दे खु ,घाडवेल ,तांदळवाडी निमगव्हाण ,खाचणे रस्ता दुरुस्ती चा फलकाचे मागच्या वर्षी अनवर्द खु गावात उद्घाटन करण्यात आले होते.तसेच एक महिन्यापूर्वी घाडवेल ते विचखेडा दरम्यान फरशी पुलाचे मोजमाप करण्यात आले होते तरीही जिल्हा परिषद या फरशी पुलाचे काम का करत नाही? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.यातील साशंकता दूर होऊन रस्ता काम ताबडतोब व्हावे अशी मागणी जनतेतून होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने