महावितरणने जो लाईन कट करण्याचा धमाका चालू केला आहे .. त्याविरोधात आज शेतकऱ्यांसह सर्व पक्षीय नेत्यांनचे रास्तारोको आंदोलन
चोपडा दि.२८ (प्रतिनिधी) शेतकरी बांधवांनी महावितरणने जो लाईन कट करण्याचा धमाका चालू केला आहे काहिच्या कट झाल्या काहीच्या होतील म्हणून *शुकवारी २९ आक्टोबर रोजी ठिक ११ वाजता धरणगांव चौफुली येथे सर्व पक्षीय नेत्यांनी रास्तारोको आंदोलन पुकारले आहे.
तरी प्रत्येक शेतकरी व ज्यांचेकडे ट्रक्टर आहे त्यांनी ट्रक्टर व ट्राली आणायची आहे कुठलेही कारण न दाखविता* स्वता साठी दोन तास दया हा रस्ता रोको कुठल्याही पक्षाचा नाही पक्षाचे जोडे बाहेर काडून व कुणाच्या दावणीला कुणी बाधला असेल तर गळ्यातून दोर सोडून या दोर नाही सुटला तर तोडून या कुठल्याही कुबळ्या चा आधार घेवू नका जसे शेतात काम आहे, बाकी जात आहेत माझे काय काम आहे , करतील ते मग आपलभी काम हुई जाईन , अप्पा , दादा काय म्हणीन अरे राजा तु आता संपत चालला तुला कुणीच वाली नाही दादा अप्पा ला ही सांगा मि आयुष्यभर तुनसाठे फिरनु तु आज मनसाठे मोर्चा मा चाल निसर्ग कोपतो आहे, मजूर कापतो आहे ,डिझेल पेट्रोल जाळतो आहे, महावितरण कट करतो आहे करा खरच शेतकरी पुत्र असाल तर मोर्चात दिसाल नाहीतर घरीच चुलीत काड्या मोडत बसाल खरा विचार मेसेज जरा कडक आहे पण कडक शिवाय आपले चढतभी नही मग यालना मोर्चात हो फक्त एकटे येवू नका दोन बंधू सोबत आणा आपलेच शेतकरी च्या अन्यायाच्या विरोधात लढणारे सैनीक तयार आहेत.तुम्हीही सहभागी व्हा असे आवाहन सर्व पक्षीय नेत्यांनी केले आहे.