शहादा तालुक्यायील वडाळी,बामखेडा, कंळबु परिसरात सौम्य भूकंप





 शहादा तालुक्यायील वडाळी,बामखेडा, कंळबु परिसरात सौम्य भूकंप

म्हसावद,ता.शहादा (प्रतिनिधी):-

     नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सावळदा येथील भूकंप मापक यंत्रावर सौम्य भुकंपाचा धक्का जाणवला असल्याची माहिती प्राप्त झाली असून २.३ रिश्टर स्केलचे सौम्य धक्के जाणवले आहेत. तालुक्यातील वडाळी बामखेडा, कळंबू परीसरात नागरीकांना भुकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळते. तरी या सौम्य धक्क्यांनी कोणतेही जिवीतहानी किंवा नुकसान झालेले नाही. या संदर्भात तहसिलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दुजोरा दिला असून नागरिकांना घाबरण्याची गरज नाही असेही सांगितले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने