वानखेडे व कराळे यांचे विरोधात चोपडा तेली समाजाची फिर्याद*


 


*वानखेडे व  कराळे यांचे विरोधात चोपडा तेली समाजाची फिर्याद*

*चोपडादि.०१(प्रतिनिधी)*- व्यंगचित्रकार गणेश वानखेडे आणि नितेश कराळे या दोघांनी संगणमत करून तेली समाजाचे श्रद्धा स्थान तेलाचा घाणा ,बैल यांचा वापर करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. जाणीवपूर्वक तेली समाजाच्या भावना दुखावण्याचा त्यांनी प्रयत्न केला .त्यामुळे चोपडा तेली समाजात असंतोष झाल्याने त्यांचे विरोधात चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये लेखी फिर्याद देण्यात आली.  त्यांचे विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. फिर्याद देताना संस्थेचे उपाध्यक्ष श्री टी. एम. चौधरी, विश्वस्त नारायण पंडित चौधरी, सहसचिव श्री प्रशांत सुभाष चौधरी, विश्वस्त  संजय कौतिक चौधरी हे जातीने हजर होते. निवेदनावर संस्थेचे अध्यक्ष श्री के. डी .चौधरी (अध्यक्ष ,प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा) यांची स्वाक्षरी  होती.श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा तर्फे चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये दोघांविरुद्ध फिर्याद देण्यात आली. चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पीआय श्री अवतार सिंह चव्हाण यांचे आदेशान्वये पीएसआय तांबे यांनी लेखी फिर्याद स्वीकारली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने