अखिल भारतीय कोळी समाज जळगाव शाखेतर्फे..शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी जिल्हाधिकारींकडे मागणी
जळगाव ,दि.०१ (प्रतिनिधी) अखिल भारतीय कोळी समाज नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्ह्याच्या वतीने मा.आ.श्री.कांतिजी कोळी साहेब, राज्य अध्यक्ष, तसेच.श्री.परेशभाई कांतिजी कोळी , युवक राज्य अध्यक्ष यांचे आदेशानुसार*श्री.अनिलदादा देविदास नंन्नवरे यांचे मार्गदर्शनाने अतिवृष्टी व अवकाळी पाऊसामुळे निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून प्रती हेक्टरी ५०,०००/- पंन्नास हजार रूपये मिळणे बाबत श्री.अभिजितजी राऊत जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यात आले.*
निवेदनात अतिवृष्टी मुळे जळगाव, धुळे,नंदुरबार जिल्ह्य़ासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे ज्वारी,बाजरी,मका,उडीद, मूग, कापूस, सोयाबीन आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले, उडीद, मूग, चवळी या पिकांना तरअक्षरशः कोंब आले आहेत.*आधीच शेतकरी हवालदिल झालेला आहे,विविध बँका, पतसंस्थेकडून, वि.का.स.सोसायटीतून,खाजगी सावकाराकडून तसेच नातेवाईकांडून हाथ उसनवारी करून आणलेले पैसे शेतीच्या मशागती साठी खर्च करून कर्ज बाजारी झालेला आहे.*नेहमीच्या नापिकी मुळे शेतकरीवर्ग तणावपूर्ण जिवन कठीतआहे व अश्या आर्थिक विवंचनेत झापडल्यामुळे आत्महत्या सारखे विचार त्याचा मनात येऊन जिवन संपवण्याच्या मार्गावर आहेत.*तरीशासनाने शेतकरीवर्गाचा गांभीर्यपूर्वक व सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने संबंधित यंञणेला आदेश करून पंचनामे करून हेक्टरी ५०,०००/- पंन्नास हजार रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे
यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष श्री.धनराजभाऊ विठ्ठल साळूंके,श्री.लिलाधरभाऊ हिरालाल सोनवणे,जिल्हा युवक सचिव,श्री.रविंद्र सैंदाणे, जिल्हा युवक उपाध्यक्ष,*श्री.योगेशभाऊ सुकदेव बाविस्कर, जिल्हा युवक सहसचिव,* कार्यकारणी सदस्य मा.श्री.रमाकांतभाऊ ताराचंद सोनवणे,*सदस्य .श्री.भिकनदादा शामराव नंन्नवरे,*तालुका युवक अध्यक्ष श्री.नितिनभाऊ बाविस्कर,*चोपडा तालुका अध्यक्ष श्री.सुकदेवभाऊ रायसिंग,*भुसावळ तालुका अध्यक्ष मा.श्री.किशोरभाऊ पंढरीनाथ सपकाळे,
श्री.बापूसाहेब तायडे,अजंदे*श्री.गणेशभाऊ श्रीराम कोळी,*धरणगाव तालुका अध्यक्ष श्री.अजयभाऊ गोपालशेठ नंन्नवरे,प्रमुख श्री.सचिनभाऊ संतोष बाविस्कर,यवल तालुका युवक अध्यक्ष श्री.विकासभाऊ (गोटूशेठ) जगनदादा साळूंके,*उपाध्यक्ष श्री.हिरालालभाऊ कोळी,*महानगराध्यक्ष श्री.अक्षयभाऊ मोरे,*सदस्य श्र.मोहनभाऊ विष्णू सपकाळे,*आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते