*
जळगांव शहर महानगरपालिके उद्या मनसेचे एक दिवसीय आंदोलन
जळगांवदि.०३(प्रतिनिधी): शहरातील झालेल्या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे शहरातील नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत मा.आयुक्त साहेब यांना अनेक वेळा निवेदन देऊन लवकरात लवकर दुरुस्ती करुन ते सुव्यवस्थित करणेबाबत कळविलेले आहे. परंतु आजतागायत सुस्त प्रशासनास याबाबत काहीएक फरक पडत नाही. त्यामुळे आता नाईलाजाने झोपी गेलेल्या प्रशासनास जाग येणेबाबत दिनांक ४/१०/२०२१ रोजी सकाळी ११.०० ते ५.०० वाजेपर्यंत मनसे संघटनेतर्फे एक दिवशीय तीव्र आंदोलन करण्यात येत आहे.
तरी सर्व अंगीकृत संघटना तसेच पदाधिकारी कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिक यांनी मोठ्या संख्येने महानगर पालिकेच्या आवारात. उपस्थित राहावे असे आवाहनजिल्हा संघटक राजेंद्र एस निकम यांनी केले आहे.