अनवर्दे खु येथे आपले सरकार सेवा केंद्रातर्फे "टेली लाॅ "बद्दल पाॅम्प्लेट वाटप*
विचखेडा ,ता. चोपडा दि.०३( प्रतिनिधी चंद्रकांत पाटील): येथुन जवळच असलेल्या अनवर्दे खु येथे दि.०३/१०/२०२१ रविवार रोजी केंद्र शासनातर्फे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी कायद्या विषयी आॅनलाईन व्हिडिओ काॅनफरन्स द्वारे वकीलांमार्फत योग्य सल्ला मिळणे त्यासाठी *आपले सरकार सेवा केंद्र (CSC) अनवर्दे खुर्दे ता.चोपडा जि.जळगांव* येथे *अनुसुचित जमातीतील (SC)* लोकांना *टेली लाॅ* बद्दल माहिती दिली व पाॅम्प्लेट (हॅन्डबील) वाटप करण्यांत आले .
हे *हॅन्डबील आपले सरकार सेवा CSC केंद्राचे संचालक श्री.जगदीश युवराज तायडे* यांच्या मार्फत देण्यात आले असून श्री.रमेश उत्तम पारे,श्री.शिवाजी दामू पारे,श्री. सुभाष माघो पारे,
श्री.विनोद शिवाजी पारे,श्री.नाना झांबर पारे,श्री.मधुकर राघो पारे यांनी टेली लाॅ बद्दल माहिती जाणून घेतली.