शिरागड निवासिनी श्री सप्तश्रुगी देवी संस्थांच्या सचिवपदी सुधाकर सोळंके
मनवेल ता.यावल दि. ०३(वार्ताहर ) येथून जवळच असलेल्या शिरागड येथील लहान गड म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री निवासिनी सप्तश्रुगी देवी संस्थांच्या सचिव पदी पोलिस पाटील सुधाकर नारायण सोळंके यांची निवड करण्यात आली.
श्री निवासिनी सप्तश्रुगी देवी संस्थानची मासिक सभा संस्थानचे अध्यक्ष शांताराम सदु सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत सचिव आंनदा बारकु पाटील यांचे नुकतेच निधन झाले त्याच्या रीक्त जागी नवीन सदस्यं निवड करण्यात यावी या विषयावर चर्चा करण्यात आली असता पोलिस पाटील सुधाकर नारायण सोळंके यांची एकमताने निवड बैठकीत करण्यात आली.
यावेळी पथराडे - शिरागड ग्रामपंचायत सरपंच योगीताताई सोनवणे प्रतापदादा सोनवणे हिम्मत सयाजी सोळंके आण्णा सदु सोळंके योगेश शांताराम सोळंके आदी उपस्थित होते.