आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर मार्गावरील गिरडगाव ते चुंचाळे गाव फाट्यापर्यंत ३ किमी पर्यंतच्या
गिरडगाव ता.यावल दि.०३(प्रतिनिधी) आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर मार्गावरील गिरडगाव ते चुंचाळे गाव फाट्यापर्यंत ३ किमी पर्यंतच्या मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण खर्च १ कोटी ५० लक्ष रुपये इतक्या किमतीचे कामाचे भूमिपूजन मा.विलासजी पारकर यांच्या हस्ते व आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे शिवसेना सह संपर्क प्रमुख रावेर मतदार संघ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी यावल कृउबा सभापती मुन्नाभाऊ पाटील , उपजिल्हाप्रमुख प्रा. उत्तमराव सुरवाडे ,तालुका प्रमुख रविभाऊ सोनवणे, माजी जि.प.सदस्य सुभाषअप्पा सोळुंके, योगेश पाटील, भारसिंग बारेला, दिनेश सोळुंके, निलेश सोळुंके, रोहिदास महाजन, एल.व्ही.पाटील, मधुकर पाटील, शेख शोहेब, संदीप पाटील, गोकुळ कोळी, संतोष महाजन, महेंद्र महाजन, विलास अडकमोल, पराग महाजन, भरत चौधरी, बाळू पाटील, कोळन्हावी सरपंच गोटूभाऊ साळुंके, हेमंत पाटील, भरत राजपूत, दिनकर साळुंके, सूर्यभान पाटील, चंद्रशेखर पाटील, दिनकर सोनवणे, निलेश महाजन, जयंत पाटील, महेंद्र पाटील, नाना पाटील, अशोक पाटील, नाना कोळी, पटवारी आबा, अण्णा कोळी, व्यंकोजी पाटील, सुरेश पाटील, निलेश पाटील, प्रदीप पाटील, विश्वनाथ पाटील, आदि पदाधिकारी शिवसैनिक व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.