गुरे चारणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर विज पडून मृत्यू .. डोंगर कठोऱ्याला कुटुंब प्रमुख हरपल्याने परिवार शोकसागरात

गुरे चारणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर  विज पडून  मृत्यू .. डोंगर कठोऱ्याला कुटुंब प्रमुख हरपल्याने परिवार शोकसागरात





यावल दि.०१ (प्रतिनिधी)तालुक्यातील डोंगर कठोरा येथे गुरे चारणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना दुपारी तालुक्यातील डोंगर कठोरा येथील रहीवाशी. ज्ञानेश्वर सुका बाउस्कर (धनगर) (वय-५०) यांच्या अंगावर विज कोसळल्याने जागीच मृत्यु झाला. या घटनेचा पंचनामा करण्यात येत आहे.

याबाबत माहिती अशी की, ज्ञानेश्वर बाविस्कर हे गुरे चारून उदरनिर्वाह करतात. आज आभाटा शिवारात आज १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता गुरे चारत असतांना वीजेच्या कडकडटासह पाऊस सुरू झाला. त्यावेळी ज्ञानेश्वर बाऊस्कर हे टेकडीवर उभे होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने ते टेकडीवरून खाली कोसळले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती सोबत असलेल्या नागरीकांनी सांगितले. घरातील कर्ता पुरूष गेल्या हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने